• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण

July 22, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी साकारत शानदार कामगिरी केली. त्याच्या शतकाने सर्व टीकाकारांची तोंड बंद झाली. कारण याच सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते, मात्र ‘हिटमॅन’ने आपल्या बॅटच्या जोरावर त्या सर्वांची बोलती बंद केली. त्याच्या शतकानंतरही भारतीय संघाला ही मालिका 2-1 ने गमवावी लागली . असं असलं तरीही रोहित शर्माने आपल्या पुनरागमनाद्वारे त्याचा दबदबा पुन्हा नक्कीच सिद्ध केला. यामुळे त्याचे चाहते चांगलेच खुश झाले.

वनडे सीरिज संपल्यावरही रोहित शर्माबद्दल सध्या तो इंग्लंडमध्येच थांबला आहे. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यानंतर त्याने ‘द ओव्हल’ला भेट दिली; मात्र तिथे त्याची भेट ‘मुंबई इंडियन्स’ संघाच्या मालक नीता अंबानी यांच्याशी झाली. त्यांनी ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील सलामीचा सामनाही पाहिला. या दरम्यान, रोहित आणि नीता अंबानी यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खरंतर आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. ही स्पर्धा संपण्यापूर्वीच, संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला ‘ट्रेड’ केलं जाईल (दुसऱ्या संघात पाठवले जाईल), अशा बातम्या समोर आल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सपासून ते कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सपर्यंतचे संघ त्याला आपल्या संघात सामील करून घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. जर हार्दिकने संघ सोडला, तर मुंबईला नवीन कर्णधाराची गरज भासू शकते.

मुंबईच्या संघात पुन्हा रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा सुरू

मंबई इंडियन्सची फ्रँचायझी असलेल्या ‘एमआय लंडन’चा (MI London) सामना मंगळवारी ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत झाला. या सामन्याला मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी उपस्थित होत्या, तसेच संघाला पाठिंबा देण्यासाठी रोहित शर्माही ‘ओव्हल’वर पोहोचला होता. या दोघांनी एकत्र सामना पाहिला, ज्यामुळे रोहित पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यात बारच काळ चर्चा झाल्यानंतर, अनेकांच्या भुवया उंचावल्या असून रोहित पुन्हा संघाचं कर्णधारपद स्वीकारेल का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

मुंबई इंडियन्सकडे ऑप्शन काय ?

सुरूवातीपासूनच रोहित शर्मा स्वतः आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं; मात्र, दोन वर्षांपूर्वी त्याला कर्णधारपदावरून हटवून ती जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. हार्दिकच्या नेतृत्वाखालील तीन हंगामांमध्ये संघ एकदा 10 व्या आणि एकदा 9 व्या स्थानावर राहिला. हार्दिकच्या कार्यकाळात सूर्यकुमार यादवने उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती, परंतु त्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं असून सध्या तो खराब फॉर्मशी झुंजत आहे. तर जसप्रीत बुमराहला तंदुरुस्तीबाबतच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या हंगामात त्याने एका सामन्यात संघाचे नेतृत्व केलं होतं.

तर आता ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेच्या सामन्यात रोहित आणि नीता अंबानी यांच्यात झालेल्या भेटीनंतर, ‘हिटमॅन’कडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकतं, अशा चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरी मुंबई इंडियन्सकडे तिलक वर्माचाही पर्याय उपलब्ध आहे, परंतु बऱ्याच काळापासून त्याच्या ‘स्ट्राइक रेट’बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जर रोहितला खरोखरच पुन्हा मुंबईचा कर्णधार बनवलं जाईल का ? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in