• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?

July 20, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्माच्या शतकामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला नसेल, पण त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. रोहित शर्माने 110 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि पाच षटकारांसह 138 धावा केल्या. ही खेळी रोहित शर्माच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी मानली जात आहे, कारण त्याला टीम इंडियामधून वगळले जाईल अशी चर्चा होती, पण या परिस्थितीतही त्याने आपल्या टीकाकारांना एका शानदार खेळीने सडेतोड उत्तर दिले. मात्र, या शतकानंतर रोहित शर्माने जे केले ते खूपच रंजक आहे. वृत्तानुसार, लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्मा जे केले आता त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

रोहित शर्मा आपल्या शतकानंतर संघाच्या बैठकीला उपस्थित राहिला आणि दोन तासांनंतर मागच्या दाराने गुपचूप बाहेर पडला. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या हॉटेलबाहेर 400 ते 500 चाहते रोहितची वाट पाहत होते, पण तो खेळाडू मागच्या दाराने गुपचूप बाहेर पडला. रोहितला लंडनमधल्या त्याच्या नातेवाईकांना भेटायला जायचे होते. त्याने विमल कुमारला सांगितले की, “मला माझ्या कुटुंबासोबत काही दिवस घालवायचे आहेत. म्हणूनच मी आता इथून गुपचूप बाहेर पडतोय. त्याने शॉर्ट्स, टी-शर्ट आणि स्लिपर्स घातले होते. त्याने कार किंवा टॅक्सी बुक केली नाही; तो लंडन ट्यूब, म्हणजेच ट्रेनने, त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला.

After scoring the most crucial century of his career, Rohit Sharma chose to stay away from the limelight. Despite being the centre of everyone’s attention and thousands of fans waiting outside the hotel, he quietly slipped out of the hotel through the back entrance in slippers… pic.twitter.com/CjwzERmE2x

— Kusha Sharma  (@Kushacritic) July 20, 2026

रोहित शर्माने लॉर्ड्सवर एक विक्रम मोडणारी खेळी केली. तो लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. इतकेच नाही, तर तो कोणत्याही परदेशी मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा खेळाडूही बनला. त्याने युएईमध्ये सात शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहित शर्माने इंग्लंडमध्ये आठ एकदिवसीय शतके झळकावली आहेत. रोहित शर्माने इंग्लंडमधील एडजबॅस्टन, ब्रिस्टल, ओव्हल, ओल्ड ट्रॅफर्ड, साउथहॅम्प्टन, ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स या मैदानांवर शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये फक्त जो रूटनेच  93  डावांमध्ये 10 एकदिवसीय शतके झळकावली आहेत, तर रोहितने केवळ 30 डावांमध्ये हे यश मिळवले आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in