• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ritesh – Genelia Deshmukh | रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटीचा प्रचार

April 22, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना ‘च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा आज, बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयात पार पडला. हा सोहळा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना ‘ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेषतः रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चुपचाप सायकल बाजूला घे, 25 रुपये टोल भर, टोल नाक्यावरील धक्कादायक प्रकाराने खळबळ
  • तांदळाच्या डब्यात टाका 2 वस्तू, वर्षभर तांदळाला लागणार नाही कीड
  • दोन भावांचे 10 वर्षांचे नियोजन, 8 सदस्यांचे कुटुंब, अशी गाठली दक्षिण कोरियाची सीमा
  • अरे..अरे..अरे..चेंडू डोक्याला धाडकन लागला, फलंदाज क्षणात जमिनीवर कोसळला; भर उन्हात मैदानावर भयंकर घडलं!
  • जगावर मोठं संकट, 150 वर्षांनंतर पुन्हा ती हादरवणारी घटना घडणार, शास्त्रज्ञांनाही फुटला घाम, भारताबाबत सर्वात मोठी बातमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in