• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अरे..अरे..अरे..चेंडू डोक्याला धाडकन लागला, फलंदाज क्षणात जमिनीवर कोसळला; भर उन्हात मैदानावर भयंकर घडलं!

April 22, 2026 by admin Leave a Comment

Cricket Accident : क्रिकेट या मैदानी खेळाचे जगभरात चाहते आहेत. भारतात तर क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळांडूना पैसा, प्रसिद्धी असं दोन्हीही भरभरून मिळतं. हा खेळ पाहताना आनंद देणारा असला तरी प्रत्यक्ष खेळणाऱ्या खेळाडूंसाठी तो कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. याआधी चेंडू लागल्याने अनेकजण मृत्युमुखी पडल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. जखमी झालेल्या खेळाडूंचीही संख्या बरीच आहे. दरम्यान, सध्या आणखी एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत फलंदाजाच्या थेट डोक्याला चेंडू लागला असून तो तिथेच मैदानावर पडला आहे. या घटनेचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल होत आहे.

खेळाडूच्या डोक्याला लागला चेंडू, भयंकर घडलं?

मिळालेल्या माहितनुसार ही घटना वेस्टइंडिजमध्ये घडली आहे. तेथे सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. याच स्पर्धेत त्रिनिदाद अँड टोबॅगो विरुद्ध लिव्हर्ड आयलँड्स यांच्यात सामना सुरू होता. यावेळी जेरेमिया लुईस नावाचा खेळाडू फलंदाजी करत होता. भर उन्हात सुरु असलेल्या या सामन्यात वेगवान गोलंदाजाने चेंडू फेकला. चेंडूची गती जास्त असल्याने लुईस याला काहीच समजले नाही. क्षणात चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला लागला. परंतु चेंडूचा मारा एवढा जास्त होता की लुईस क्षणात जमिनीवर कोसळला.

लुईसला चेंडू खूप लागला होता. त्यामुळे त्याने तत्काळ डोक्यावरील हल्मेट काढले. जास्त त्रास होत असल्याने तो आपले हात जमिनीवर आदळताना दिसतोय. रागाच्या आणि वेदनेच्या भरात त्याने हेल्मेटला लाथही मारल्याचे दिसत आहे. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तो चालत मैदानाच्या बाहेर गेल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

Jayden Seales has claimed the first seven wickets to fall in an innings for Trinidad & Tobago against Leeward Islands, but looks set to be denied the chance to take 10 with the game halted due to a dangerous pitch. The last ball before the suspension is not for the faint-hearted pic.twitter.com/o4G5ULiSAh

— Ben Gardner (@Ben_Wisden) April 21, 2026

दरम्यान, तो मैदानाच्या बाहेर चालत गेलेला असला तरी रुग्णालयात मात्र त्याला रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयाच उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे सामन्याच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे तो सामनाच रद्द करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रिक्षा-टॅक्सी, ओला-ऊबर इ-बाईक टॅक्सीचालकांना मराठी सक्तीचे, नाही बोलला तर… राज्य सरकार सरसावलं
  • Sindhudurg | कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात कसा घडला?
  • Baisaran Ghati : एकदा हे फोटो बघा मग समजेल पहलगामच्या बैसरन घाटीला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात? जागेच्या प्रेमात पडालं
  • पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण
  • मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितला थेट न्यूक्लिअर कोड? जगभरात मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in