• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rekha : रेखा यांच्या हटके ट्रान्सफॉर्मेशनवर मेहुण्याने सोडलं मौन, सावत्र बहिणीचा नवरा असं म्हणाला तरी काय?

August 8, 2026 by admin Leave a Comment


Rekha : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आज वयाच्या 71 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देतात. आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात. पण पूर्वी रेखा जाड होत्या आणि दिसायला देखील इतक्या सुंदर नव्हत्या… पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर रेखा यांनी स्वतःमध्ये अनेक बदल केले… त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेले बदल पाहून रेखा यांचे मेहुणे तेज सु्प्रू यांना देखील मोठा धक्का बसला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तेज सुप्रू यांनी रेखा यांच्या ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा सांगितला आहे.

‘Rediff Originals’च्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तेज सप्रू म्हणाले, ‘रेखाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा ती जाड होती. हे सर्वांना माहितीच आहे… पण त्यानंतर तिने स्वतःमध्ये जे बदल केले, ते खरंच कौतुकास्पद आहेत. रेखा हिने फक्त वजन कमी केलं नाही तर, स्वतःच्या पर्सनॅलिटीत आणि स्टाईलमध्ये देखील मोठे बदल केले. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं… आज रेखा हिच्या सौंदर्याचं अनेक जण कौतुक करतात. पण यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. रेखा फक्त अभिनेत्रीच नाही तर, उत्तम गायिका देखील आहे.’

तेज सप्रू पु़ढे म्हणाले, ‘एवढंच नाही तर, रेखा हिच्या लिखाणाचा अंदाज देखील फार वेगळा आहे. ज्या अंदाजात रेखा चिठ्ठ्या किंवा नोट्स लिहिते, ते फार खास आहे. मी नुकताच रेखाला ‘इंडियन आयडल’मध्ये पाहिलं आहे आणि तिला पाहिल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. अशी महिला जिने सुरुवातीच्या काळात स्वतःवर इतकी मेहनत घेतला. त्यासाठी रेखा हिच्यासाठी असलेला आदर आणखी वाढला आहे..’, असं देखील तेज सप्रू म्हणाले आहेत.

तेज सप्रू आणि रेखा यांची सावत्र बहीण…

तेज सप्रू आणि रेखा यांचं नातं काही खास आहे. तेज सप्रू हे रेखा यांची सावत्र बहीण धनलक्ष्मी यांच्यासोबत 1987 रोजी झाली. पण त्यांच्या लग्नाआधीच भाऊ – बहीण म्हणून तेज आणि रेखा यांचं नात खास होतं. एवढंच नाही तर, रेखा त्यांनी राखी देखली बांधायच्या. धनलक्ष्मी या अभिनेत्री पुष्पवल्ली आणि सिनेमॅटोग्राफर के. प्रकाश यांच्या कन्या आहेत. तर रेखा या के. प्रकाश आणि अभिनेत्री जेमिनी गणेशन यांच्या कन्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in