• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Red Ants Removal Tips : किचनमधला हा पदार्थ म्हणजे लाल मुंग्यांचा शत्रू, 2 मिनिटांत होतील गायब

April 29, 2026 by admin Leave a Comment


How to get rid of ants in kitchen : उन्हाळा येताच गरमी, चिकचिक, उकाड्यासह अनेक समस्या घेऊन येतो. या समस्यांमधील आणखी एक म्हणजे किचन आणि घरात सर्वत्र वाढणारा मुंग्यांचा वावर. उन्हाळा सुरू होताच घरांमध्ये, विशेषतः स्वयंपाकघरात लाल मुंग्यांचा उपद्रव वाढतो. त्या केवळ अन्नपदार्थ खराब करत नाहीत, तर त्या आपल्याला चावल्यास तेही फार वेदनादायक ठरतं. त्यांचा सामना करण्यासाठी अनेक कीटकनाशकं उपलब्ध आहेत, परंतु स्वयंपाकघरासारख्या ठिकाणी आपण कीटकनाशक वापरू शकत नाही ना, कारण तिथेच आपले अन्न साठवलं जातं.

मुंग्यांना या वासाची ॲलर्जी

मग कीटकनाशक न फवारात या मुग्यांना कसं घालवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रॉब्लेमचं उत्तर सोप्प आहे, तेच जाणून घेऊणार आहोत. मुंग्यांचा सफाया करण्यासाठी महागडी आणि विषारी कीटकनाशकं गरजेची नाहीत. आपल्या किचनमध्येच असलेल्या 2 गोष्टी या मुंग्यांचा शत्रू असतात. ज्याचा वापर केल्याने घरात परत कधीच मुंग्या फिरकणार नाहीत.

1) व्हाईट व्हिनेगर

मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी व्हिनेगर ही सर्वात प्रभावी आणि शास्त्रीय पद्धत आहे. मुंग्या त्यांच्यामागे एक विशिष्ट गंध सोडतात, ज्याचा माग इतर मुंग्या काढतात. मात्र व्हिनेगरचा वास तीव्र असल्यामुळे, मुग्यांचा माग काढण्याचा मार्ग नष्ट करतो, ज्यामुळे त्या वाट चुकतात आणि परत येत नाहीत.

कसं वापराल व्हिनेगर?

एका स्प्रे बॉटलमध्ये समान प्रमाणात पाणी आणि पांढरं व्हिनेगर मिसळा. जिथे जिथे तुम्हाला मुंग्या दिसतात किंवा जिथून त्या आत येत असतील, तिथे हे मिश्रण फवारा. काही मिनिटांतच मुंग्या नाहीशा होतील.

2. दालचिनी

आपल्याला दालचिनीचा वास आवडतो, पण मुंग्यांसाठी तो एका ‘केमिकल वेपन’सारखा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की दालचिनीच्या तीव्र वासामुळे मुंग्यांच्या श्वसनसंस्थेत अडथळा येतो, ज्यामुळे त्या पळून जातात.

दालचिनीने मुंग्यांना कसं पळवून लावावं ?

ज्या कोपऱ्यांमधून किंवा फटींमधून मुंग्या बाहेर पडतात, तिथे तुम्ही दालचिनीची पूड शिंपडू शकता. याव्यतिरिक्त, कापसाचे बोळे दालचिनीच्या तेलात भिजवून ते त्या त्या भागांवर ठेवणे देखील खूप प्रभावी ठरू शकते.

करा सोपे उपाय

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आणखीही काही सोपे उपाय करू शकता

लिंबाचा रस: व्हिनेगरप्रमाणेच, मुंग्यांना लिंबाचा आंबट वास आवडत नाही. फरशी पुसताना पाण्यात थोडा लिंबाचा रस घालणे फायदेशीर ठरते.

पुदिना : वाळलेली पुदिन्याची पाने किंवा पुदिन्याचे तेल देखील मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात.

तमालपत्र : स्वयंपाकघरातील डब्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये एक-दोन तमालपत्र ठेवल्याने मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

अशी घ्या काळजी

हे सगळे उपाय करतानाच आपल्या घरात स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरातील फरशीवर राहिलेले गोड पदार्थ, साखर किंवा अन्नाचे कण मुंग्यांना आकर्षित करतात. त्यामुळे, दररोज फरशी झाडून आणि नीट पुसून घ्या आणि खाद्यपदार्थ झाकून ठेवा. घरात ओलावा किंवा पाणी साचू देऊ नका, कारण यामुळेही मुंग्या आकर्षित होतात. मुंग्यांना घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी भेगा आणि छिद्रे बंद करणं देखील आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. )

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • May Bank Holiday : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
  • विजय थलपतीचं साईबाबांकडे विजयासाठी साकडं; शिर्डीत सुपरस्टारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
  • जास्वंदीचा चहा आरोग्यास लाभदायक, शरीरात हे बदल घडतात
  • उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायदा? नेमकं काय घडणार?
  • तुम्हीही ही चूक करताय का? कारचे इंजिन ऑइल आणि फिल्टर्स कधी बदलावेत, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in