
Rapido Auto Ride : दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर येत असलं तरी, काही व्यक्ती अशा आहेत, ज्या प्रामाणिक आणि योग्य मार्गावर चालतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. सांगायचं झालं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई येथील मुलुंड येथून ऐरोलीसाठी एक महिला रॅपिडो रिक्षा बूक करते, पण मद्यधुंद असल्यामुळे त्या महिलेला जराही शुद्ध नव्हती. अशात अवस्थेत महिलेसोबत काहीही घडू शकत होतं. पण रिक्षा चालकाने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे..
या व्हिडिओमध्ये, मध्यरात्रीच्या वेळी अतिमद्यपान केलेली एक महिला ‘रॅपिडो’ (Rapido) रिक्षा बुक करते. तिने सोन्याची साखळी घातलेली असते, तिच्या हातात दोन फोन असतात आणि ती पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असते; अशा परिस्थितीत तिच्यासोबत काहीही अनुचित घडलं असतं. मात्र, त्यानंतर जे घडले ते पाहून लोकांचे डोळे पाणावले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
View this post on Instagram
रिक्षा चालकाने जेव्हा पाहिलं की, महिला पूर्णपणे नशेत आहे, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार आला की, महिलेचं कोणतं सामान कर कुठे पडलेलं नाही, कारण काही हरवल्यानंतर जबाबदार रिक्षा चालकाला ठरवण्यात आलं असतं. पण रिक्षा चालक घाबरला नाही, त्याने मोठ्या हुशारीने कॅमेरा सुरु ठेवला. प्रवास संपेपर्यंत त्याने व्हिडीओ सुरु ठेवला आणि महिलेला सुरक्षित घरी पोहोचवलं… ड्रायव्हरने स्वतः सांगितलं की, महिलेकडे दोन सोन्याच्या चैन आणि दोन मोबाईल फोन होते… जर महिलेच्या वस्तू कुठे हरवल्या असत्या, तर जबाबदार मी राहिलो असतो..
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ज्या प्रकारचं वातावरण आहे, ते पाहता रिक्षा चालकाने योग्य ते केलं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रिक्षा चालक गरीब असला तरी, प्रामाणिक आहे…’, तर अन्य एका वक्तीने महत्त्वाची कमेंट केली, ‘एका व्यक्तीच्या चुकीचं खापर सर्व पुरुषांना भोगावं लागतं…’, सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Leave a Reply