• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ramayana Trailer: कसा आहे तब्बल 4000 कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर?

July 30, 2026 by admin Leave a Comment


नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. आज (30 जुलै) पहाटे 4.15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर आणि लंकापती रावणाच्या भूमिकेतील अभिनेता यशने सर्वांनाच थक्क केलं आहे. या चित्रपटात रणबीर आणि यश यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळणार असून त्याची एक झलक ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये दिसली. जवळपास 4 मिनिटं 9 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय या सर्वांच्या भूमिका पहायला मिळत आहेत.

‘रामायण’ या ट्रेलरची सुरुवातच यशच्या एण्ट्रीने होते. एका फकिराच्या वेशात तो राजवाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रक्षक त्याला विचारतात, “तू कोण आहेस?” त्यावर रावणाच्या भूमिकेतील यश उत्तर देतो, “तुमचा नवीन राजा”. त्यानंतर तो जोरात लाथ मारून राजवाड्याचा भव्य दरवाजा उघडतो आणि आत प्रवेश करतो. “देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक.. या तिन्ही लोकांमध्ये फक्त एकाचंच राज्य असेल.. रावणराज” या संवादाने रावणाच्या शक्तीशाली भूमिकेची ओळख करून दिली जाते. त्यानंतर राजा दशरथ यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यज्ञ आणि हवन करताना दिसतात.

पहा ट्रेलर

प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील रणबीर कपूर महाकाय प्राणी आणि विविध राक्षसांशी लढताना दिसतो. कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता, सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील रवी दुबे, शूर्पणखाच्या भूमिकेतील रकुल.. हेसुद्धा विशेष लक्ष वेधून घेतात. या संपूर्ण ट्रेलरमध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता सनी देओल याची कोणतीच झलक पहायला मिळत नाही. ‘रामायण’ या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावर जोरदार टीका झाली होती. व्हिज्युअल इफेक्ट्स, तसंच राक्षसांना पशूंच्या रुपात दाखवल्याबद्दल टीका झाली होती. मात्र 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील कार्यक्रमात जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा त्याचं सर्वत्र कौतुक झालं.

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून दोन्ही भागांचं बजेट तब्बल 4000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. हा पहिला भाग यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in