
राम मंदिर दान चोरी प्रकरणात चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय SIT ची फिल्ड इनक्वायरी पूर्ण झाली आहे. एसआयटीने या प्रकरणात 70 पेक्षा जास्त लोकांची जबानी नोंदवून घेतली आहे. आता चौकशी महत्वाच्या टप्प्यात आहे. पुराव्यांचं विश्लेषण सुरु आहे. ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली आहे. सुरक्षा कर्मचारी आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांची जबानी नोंदवली आहे. कॅश मॅनेजमेंटशी संबंधित बँक अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली आहे. वेगवेगळ्या लोकांच्या जबानीमध्ये जी तफावत आढळून आलीय, त्याचा आता SIT कडून तपास सुरु आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply