• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय

July 23, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीत सध्या मोठं आंदोलन पेटलं आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहरा, पेपरफुटीवरून विद्यार्थी आक्रमक झाले असून शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवेस आणखीनच व्यापक होत चालल असून आता अनेक राजकीय नेते, पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला सिने क्षेत्रातील कलाकार, वेगवेगगळे बडे राजकीय नेते पाठिंबा देताना दिसत आहेत. देशातील ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतर काल ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटीचे चार फोटो शेअर केले होते. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. विद्यार्थी आंदोलन, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला मोर्चा यासह ठाकरे बंधू विविध विषायंवर सविस्तर बोलले. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र याच वेळी त्यांना मोदी – शरद पवार यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरंनी अवघ्या 3 शब्दांत, पण समर्पक उत्तर दिलं, त्याचीच सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे.

3 शब्दांत राज ठाकरेंचं उत्तर काय ?

विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डा म्हणाले होते.  मग भाजप आजवर काय करत आलं ? असा ठेट सवाल राज ठाकरेंनी केला.  काँग्रेसच्या काळातही आंदोलंन झाली, त्यानंतर सरकार बदललं,  ते तसे होते म्हणून भाजपला आणलं, पण हेही तसेच आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर राज व उद्धव यांना मोदी पवार यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरेंनी फक्त 3 शब्द उच्चारले. ‘त्यालाच जंतरमंतर म्हणतात’ असं म्हणतं, राज ठाकरेंनी फक्त 3 शब्दांत समर्पक प्रतिक्रिया देत विषयच संपवला. ते ऐकताच एकच खसखस पिकली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उरलीसुरली माणुसकी मेली… नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?
  • अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
  • अरे काय रे शिंदे गट? सोड रे, अरे चोरच आहेत ना? मुंबईचं महापौरपद किती कोटीला? राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
  • सर्वात मोठी बातमी ! नेपाळनंतर आता चीन हादरलं, भूकंपाने जमीनच डगमगली; नागरिकांमध्ये धावपळ
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in