• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..

June 30, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. अखेर राज्यात सर्वदूर मॉन्सून दाखल झाला. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून पाऊस सतत कोसळत आहे. राज्यभरात पावसाने हजेरी लावली. शेतकरीही समाधानी आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत आहे. यंदा राज्यात तब्बल 15 दिवस उशिराने पाऊस दाखल झाला. सध्या पावसाची बॅटिंग जोरदार बघायला मिळत आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. कोकणात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीच्या खेर्डी येथे 197 मिलिमीटर, धामनंद येथे 192 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोलाड, इंदापूर, तुडील, महाड, देवगड, चिपळून, देवरूख मंडनगड या भागात जोरदार पाऊस झाला. कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसतंय. कोकण, घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र ते पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेत तयार झाला.

ज्यामुळे पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, छत्तीसगड या भागात मॉन्सूनने वाटचाल केली. मॉन्सूनला पोषक वातावरण असून दोन ते तीन दिवसात उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात मॉन्सून पुढे सरकण्याची शख्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री दोन वाजल्यापासून सुमारे दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे.  या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताच्या स्टार क्रिकेटपटूच्या घरात मोठा राडा; जेवण बेचव बनवल्याने वडिलांच्या साथीने केली आचाऱ्याला मारहाण, पोलिसांत FIR दाखल
  • भारतीय संघाचा पराभव होतोय हे पाहून आनंद झाला…पाकिस्तानी क्रिकेटपटू नको ते बरळला; विधानाची जोरदार चर्चा
  • Horoscope Today 30th June 2026 : काऊंटडाऊन सुरू, जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्ठं काम होणार… या राशींचा फायदा !
  • Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..
  • भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या…फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in