• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Alert : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भयंकर संकट, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, या राज्यांनाही गंभीर इशारा

April 19, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे, त्यामुळे अनेक राज्यांमधील तापमान वाढलेले आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालमधील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशातच आता संपूर्ण देशातील हवामानात मोठा बदल जाणवणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीर आणि शेजारील पाकिस्तान भागावर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे यामुळे उत्तर-पश्चिम ते पूर्व भारतात वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

हवामान विभागाने राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये (गुरुग्राम, फरीदाबाद, नोएडा, गाझियाबाद, मेरठ, सोनीपत) पावसाचा येलो आणि काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये 50-70 किमी/ताशी वेगाने धुळीचे वारे वाहून त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांमध्ये काय स्थिती?

उत्तर प्रदेशातील नोएडा, गाझियाबाद, मेरठ, आग्रा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसासह बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बिहार आणि बंगालमध्येही वादळी पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या पूर्व भागात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते.

महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

IMD कडून खबरदारी घेण्याचे आवाहन

  • 70 किमी/ताशी वेगाच्या वाऱ्यांपासून सावध राहा
  • वादळाच्या वेळी घरातच थांबा
  • विजेची उपकरणे बंद करा
  • झाडाखाली उभे राहू नका
  • शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?
  • Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
  • PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा
  • दीपिकाचे वडील होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची खबर वाचून कोसळलं होतं रडू
  • Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in