
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी आपापल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी तिकिटाचे आरक्षण करतात. आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच रेल्वेचे तिकीट कसे बुक करावे, तिकीट कन्फर्म कसे होईल ते जाणून घेऊ या…
रेल्वेच्या नियमानुसार यात्रेच्या तारखेपासून 60 दिवसांच्या अगोदर तुम्हाला तुम्हाला तिकिटाचे आरक्षण करता येते. यंदा दिवाळी 8 नोव्हेंबर रोजी आहे. म्हणजेच आता या सणासाठी तुम्हाला तिकीट आरक्षित करता येणार आहे. नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमच्या गावी जायचे असेल तर त्यासाठी 6 सप्टेंबरपासूनच तिकिटाचे आरक्षण सुरू झाले आहे.
तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट किंवा IRCTC Rail Connect अॅप मोबाईलमध्ये उघडा. यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे याची माहिती टाका.
त्यानंतर तुमच्या प्रवासाची तारीख म्हणजेच Journey Date निवडा. आता ‘Search Trains’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्गावरील रेल्वेची यादी पाहायला मिळेल. ट्रेनचे नाव, क्रमांक, वेळ आणि विविध श्रेणींमधील सीटची उपलब्धता पाहून घ्या. त्यानंतर प्रवाशांची माहिती, नाव, वय लिंग याची माहिती टाका.
पूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जाऊन पैसे भरा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासाचा पीएआर क्रमांक मिळेल. भविष्यकालीन प्रवासासाठी हा पीएनआर नंबर सेव्ह करा. तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉनट काढून घ्या. आरक्षणासाठी तिकीट उपलब्ध असतील तर तुमचे सिट आरक्षित केले जाईल.




Leave a Reply