
Rahul Gandhi Press Conference : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. 21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला घेरलं आहे. नीट पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हे मुद्दे उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या तीन मागण्या आहेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
मला माझी पर्वा नाही, परंतु विद्यार्थ्यांना…
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? याबाबत भाष्य केलं. विद्यार्थ्यांसोबत अमानुषपणे वागणूक देण्यात आली आहे. माझ्यासोबत जो व्यवहार झाला, त्याची मला पर्वा नाही. आणखी पाच वेळा जरी माझ्यासोबत असाच व्यवहार झाला तरी मला त्याचे काहीही वाटणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत आमचा लढा चालूच राहील, असे संकेत त्यांनी दिले.
बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply