
बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मद्यं मिळतात. यातील काही मद्यं ही वेगवेगळ्या फळांच्या मदतीने तयार केली जातात. जी मद्यं नैसर्गिक पद्धतीने तयार केली जातात, त्यांना जास्त प्रमाणात पसंदी मिळते. परंतु आजकाल फक्त फ्लेवरचा उपयोग करून काही मद्यं तयार केली जात आहेत.
त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेले मद्य तसेच फक्त फ्लेवर वापर तयार करण्यात आलेल्या मद्यांमधील फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. यातील पहिला फरक म्हणजे जी मद्यं कृत्रिम फ्लेवरचा वापर करून तयार केलेली असतात त्यांंना गंध जास्त असतो.
एखादे मद्य पिल्यानंतर ते जास्तच कडू लागत असेल तर त्यात कृत्रिम फ्लेवर वापरण्यात आलेला असू शकतो. नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मद्याची चव हलकी आणि जास्त स्ट्रँग नसते. तर आर्टिफिशियल एजंटच्या मदतीने तयार केलेल्या मद्याला संबंधित फ्लेवरची जास्त चव असते. तसेच त्या मद्याचा वासही खूप येतो.
मद्याचा रंग खूपच गडत असेल तर त्यात आर्टिफिशयल एजंट टाकण्यात आलेले असू शकात. चव चांगली लागावी यासाठीही हे कृत्रिम पदार्थ वापरलेले असू शकतात. मद्याचा गंध काह वेळाने जात असेल तर त्यात वरून कृत्रिम फ्लेवर मिसळलेले असू शकतात.
(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply