
Prashant Kishor : जन सुराज पक्षाचे (Jan Suraaj) प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करत भाजपचा दारुन पराभव केला आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा उपनिवडणुकीत 31 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांच्या मोठ्या फरकाने भाजप उमेदवार नीरज सिन्हा (Neeraj Sinha) यांचा पराभव केला. बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण आता प्रशांत किशोर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठा सुरुंग लावला आहे. या मोठ्या विजयानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त प्रशांत किशोर यांची चर्चा रंगली आहे. दरम्यान त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्याकडे तब्बल 200 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर देशातील विविध राज्यांमध्ये त्यांची संपत्ती पसरलेली आहे… तर जाणून घ्या प्रशांत किशोर यांच्या संपत्तीबद्दल…
200 कोटी संपत्तीचे मालक आहेत प्रशांत किशोर आणि त्यांची पत्नी
निवडणुक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्याकडे एकून 96 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यामध्ये 22.19 कोटी रुपयांची चल संपत्ती (कॅश, बँकेतील बचत, गुंतवणूक इत्यादी) आहे, तर 73.87 कोटी रुपयांची अचल संपत्ती (जमीन आणि घर) आहे. तर त्यांच्यावर जवळपसा 5.78 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची पत्नी डॉ. जान्हवी दास याच्यांकडे 101 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये 89.51 कोटी रुपयांची चल संपत्ती आणि 12.42 कोटी रुपयांचा अचल संपत्ती आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये पसरली आहे संपत्ती…
प्रशांत किशोर आणि पत्नीने जाहीर केलेली एकूण मालमत्ता 198 कोटी रुपयांहून अधिक आहे. मात्र, शपथपत्रात नमूद केलेली इतर मालमत्ता आणि गुंतवणूक विचारात घेता, त्यांची एकत्रित संपत्ती 208 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं दिसून येतं. प्रशांत किशोर यांच्या मालकीचे पाटणा आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक घर आहे. तसेच, गाझियाबाद मधील इंदिरापुरम येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे दोन फ्लॅट्स आहेत आणि बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात त्यांची वडिलोपार्जित मालमत्ताही आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, किशोर यांच्याकडे 65 हजार 570 रुपयांची रोकड आहे… तर त्यांची पत्नी डॉ. जान्हवी दास यांच्याकडे 1.95 लाख रुपयांची रोकड आहे. कागदपत्रावर किशोर यांचे क्षेत्र ‘राजकीय सल्लागार’ असं नमूद केलं आहे. दरम्यान, डॉ. जान्हवी दास या नवी दिल्लीतील अपोलो इंद्रप्रस्थ रुग्णालयात ‘वरिष्ठ सल्लागार’ म्हणून कार्यरत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी, किशोर यांनी संयुक्त राष्ट्रांसोबत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ म्हणून सुमारे आठ वर्षे काम केलं. या काळात त्यांनी आरोग्य आणि पोषणविषयक विविध कार्यक्रमांवर काम केलं; सुरुवातीला त्यांनी भारतात आणि त्यानंतर आफ्रिकेत देखील काम केल्याची माहिती समोर येत आहे.
Leave a Reply