• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pradeep Rawat: सतत उचक्या अन् थेट कॅन्सर..; ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत यांच्या मुलाचा खुलासा

August 6, 2026 by admin Leave a Comment


Pradeep Rawat : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रदीप रावत यांचं 4 ऑगस्ट 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बुधवारी 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. आमिर खान, यशपाल शर्मा, अखिलेंद्र मिश्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रदीप रावत यांचा मुलगा विक्रमादित्य रावत याने त्यांना मुखाग्नी दिला. वडिलांच्या अंत्यविधीनंतर माध्यमांशी बोलताना विक्रमादित्य खूप भावूक झाला. वडिलांच्या अखेरच्या क्षणांची आठवण सांगताना तो म्हणाला की, जेव्हा प्रदीप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आयसीयूमध्ये सीपीआर दिला जात होता, तेव्हाच त्याला वडिलांची अवस्था समजली होती. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत वडील पूर्णपणे ठीक होते, हे सर्व दीड महिन्याच्या आत घडलं आहे, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

“दीड महिन्यापूर्वी त्यांना सतत उचकी..”

वडिलांविषयी त्याने पुढे सांगितलं, “त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरविरुद्धची लढाई हरून ते आम्हा सर्वांना सोडून गेले. दीड महिन्यापूर्वी त्यांना सतत उचकी लागत होती. त्यानंतरच त्यांना रक्ताचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. रोज उचकी लागत असताना तो कॅन्सर असू शकतो, असा विचार तरी कोणी कसा करू शकेल? आम्ही त्यांना औषधं दिली, पण हळूहळू त्यांची प्रकृती आणखी बिघडत गेली. आम्ही घरी डॉक्टरला बोलावलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबांना पोटाचा संसर्ग झाला असावा. त्यांना औधषं दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.”

“दोन महिन्यांपूर्वीचे रिपोर्ट्स क्लिअर होते तरी..”

“मी अभिनयाच्या कार्यशाळेत असताना मला माझ्या आईने फोन करून बाबांची प्रकृती खालावल्याचं कळवलं होतं. त्यांना आम्ही डॉक्टरांकडे नेलं. रक्त तपासणीत त्यांच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या खूप जास्त असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला कोकिलाबेन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. जेव्हा बाबांना कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबांना रक्ताच्या कर्करोग (ल्यूकेमिया) झाल्याची 99 टक्के शक्यता आहे. दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट्समध्ये ल्यूकेमियाचं निदान निश्चित झालं होतं. त्यातून ते बरेसुद्धा झाले होते. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या संपूर्ण शारीरिक तपासणीत काहीही आढळलं नव्हतं. हे सर्व दीड महिन्याच्या आत घडलं”, असं सांगत विक्रमादित्य भावूक झाला.

तो पुढे म्हणाला, “दोन दिवसांपूर्वीच डॉक्टर म्हणाले होते की रिपोर्ट्स चांगले येत आहेत. प्लेटलेट्स वाढत होत्या. बोन मॅरो ट्रान्सप्लांटची तयारी सुरू होती. मात्र अचानक त्यांना ताप आला आणि प्लेटलेट्स थेट 3000 पर्यंत कमी झाले होते, ज्या सर्वसामान्यपणे 3 ते 3.5 लाख असायला हव्या होत्या. डॉक्टरांना त्यांना तातडीने आयसीयूमध्ये नेलं. जेव्हा मी डॉक्टरांना सीपीआर देताना पाहिलं, तेव्हा मला समजलं आणि आई रडू लागली.”

प्रदीप रावत हे 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य रावत असा परिवार आहे. प्रदीप यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सरफरोश’, ‘अग्निपथ’ आणि ‘लगान’मधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in