• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM मोदींचा भार कमी होणार, हा दिग्गज नेता थेट उपपंतप्रधान? दिल्लीत हालचालींना वेग

July 4, 2026 by admin Leave a Comment


देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून हालचालींना वेग आला आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील खासदारांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच एक बड्या नेत्याला थेट उपपंतप्रधानपदाची जबाबदारी मिळू शकते. याबाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. कोणत्या नेत्याला कोणते खाते मिळू शकते ते जाणून घेऊयात.

अनेक मंत्र्यांची खाती बदलणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपची नवी संघटनात्मक टीम जवळपास तयार झाली आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या फेरवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या खात्यात बदल केला जाऊ शकतो. तसेच काही युवा नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते.

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हा फेरबदल होऊ शकतो. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नव्या टीमची घोषणा आणि मंत्रिमंडळ विस्तार हे एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. त्यांच्या जागी इतर नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.

अमित शाह उपपंतप्रधान ?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते. काही राजकीय जाणकारांच्या मते, आगामी फेरबदलात त्यांची थेट उपपंतप्रधानपदी नियुक्ती होऊ शकते. सध्या अमित शाह हे केंद्र सरकार, पक्ष संघटना आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जर त्यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती झाली, तर भविष्यातील नेतृत्वाबाबत भाजपकडून हा मोठा संदेश असणार आहे. कारण भविष्यात मोदींनंतर त्यांच्याकडे पंतप्रधानपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in