• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM नरेंद्र मोदी यांनी सेवातीर्थ येथे घेतली सचिवांची बैठक, आत्मनिर्भर भारताला गती देण्याचे दिले आदेश

June 30, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सेवातिर्थ या निवासस्थानी आज दोन महत्त्वाच्या विषयांवर आपल्या सचिवांशी चर्चा केली आहे. यातील  पहिला विषय होता ‘व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभता  यासाठी नियमसुलभीकरण आणि  इतर सुधारणा’,  आणि दुसरा विषय होता ‘आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देणे’ अशा दोन विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी सचिवांशी हितगुज केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सेवातीर्थ या सरकारी निवासस्थानी भारत सरकारच्या सचिवांशी संवाद साधला आहे. या महत्वाच्या चर्चेचा केंद्र बिंदू दोन महत्वाच्या विषयांवर होता. पहिला विषय होता की ‘व्यवसाय सुलभता ( Ease of Doing Business ) आणि जीवन सुलभता ( Ease of Living ) यासाठी नियमसुलभीकरण ( Deregulation )  आणि इतर सुधारणा’, आणि दुसरा विषय होता ‘आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देणे’

या संवादादरम्यान केंद्र सरकारच्या सचिवांनी त्यांचे मंत्रालय आणि विभागांकडून या दोन प्रमुख विषयांच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर यावेळी सचिवांनी प्रकाश टाकला. तसेच, विविध क्षेत्रांतील आव्हाने, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यात सुशासन आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी आखलेल्या धोरणांवरही देखील चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संवाद करताना ‘संपूर्ण शासन’ (Whole-of-Government) या दृष्टिकोनाचा अवलंब करण्यावर आणि विभागीय पातळीवरील भिंती (Silos) दूर करण्यावर भर दिला. एकात्मिक नियोजन आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी पीएम गतिशक्ती या व्यासपीठाचा विविध विभागांमधील समन्वय आणि माहितीपूर्ण निर्णयप्रक्रियेसाठी अधिक व्यापक वापर करण्याचे आवाहनही पीएम मोदी यांनी केले.

येथे पोस्ट पाहा –

#BreakingNews | PM @narendramodi interacts with Secretaries to the Government of India at Seva Teerth, with discussions centred on two key themes: advancing deregulation and reforms to improve Ease of Doing Business and Ease of Living, and promoting #AatmanirbharBharat.

PM Modi… pic.twitter.com/jGmxSQl5g3

— DD News (@DDNewslive) June 30, 2026

विविध सरकारी योजनांचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणारा प्रत्यक्ष आणि सकारात्मक परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत  सचिवांना केले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बायको सोडून गेली, शिया समुदायावर होता राग, मोहरमची वाटच पहात होता आरोपी प्रेमजी..
  • IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्तराने संभ्रम वाढला
  • सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं?
  • स्वतःची कबर खणायला…, बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण करणारी पोस्ट
  • ट्रेनमध्ये सोबत नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार… रेल्वेचा नियम वाचला का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in