• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बायको सोडून गेली, शिया समुदायावर होता राग, मोहरमची वाटच पहात होता आरोपी प्रेमजी..

June 30, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात विषाचा प्रयोग करुन त्यांना मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उघड केला होता.या प्रकरणात आता नवीन माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात पुणे विमाननगर येथील रहिवासी फैयाझ निसार हुसैन प्रेमजी ( ३९) याच्या संदर्भात एक नवीन माहिती उघडकीस आली आहे. कौटुंबिक दृष्ट्या अस्थिरता,समाजाकडून बहिष्कृत होणे आणि मानसिक आरोग्य ही कारणे समोर आली आहेत.

आरोपी फैयाझ प्रेमजी याने मोहरम मिरवणूकीच्या दोन आठवड्या आधी एका स्वस्तातल्या हॉटेलात उतरला होता. तेथे त्याने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन ३० हजार रिकाम्या कॅप्सुल आणि सुमारे ५० किलोग्रॅम झिंक फॉस्फाईड मागवले होते. झिंक फॉस्फाईड एक अत्यंत विषारी घटन असून सर्वसाधारण पणे उंदीर मारण्यासाठी किटक नाशकात वापरले जाते. आरोपनी अनेक दिवस हॉटेलात राहून या कॅप्सुल तयार केल्याचे म्हटले जात आहे.

तपासात काय पुढे आले…

पोलिसांना तपासात आढळले की प्रेमजी याचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन उद्धवस्थ झाले होते. त्यामुळे तो भावनात्मक रुपाने नैराश्यात होता. आणि आपल्याच समुदायाच्या लोकांबद्दल त्याच्या मनाज नाराजी होती. आरोपीला त्याच्या धर्माबद्दल संताप आला होता. त्याने काही वर्षांआधी मुस्लीम धर्माशी संबंधित प्रथा आणि परंपरांचा विरोध करणारी पत्रके वाटली होती. त्यानंतर धार्मिक गुरुंनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कथित रुपाने समाजातून बहिष्कृत केले होते.

सामाजिक रुपाने वाळीत टाकल्यानंतर प्रेमजी याने त्याची आई, मोठा भाऊ मोहम्मद अब्बास आणि त्याच्या दोन लहान बहिणी- सकीना आणि रुबीना याच्या सोबत पुण्याला गेला. तो कधी कधी मुंबईत यायचा आणि डॉर्मिटरीत राहायचा.

प्रेमजी याने बॅचलर ऑफ बिझनस एडमिनिस्ट्रेशन (BBA) केले आहे आणि त्याचा विवाह झाला होता. मात्र, त्याच्या पत्नीने त्याला चार वर्षांपूर्वी सोडले होते. तपासअधिकाऱ्यांच्या मते कुटुंबातील तणावपूर्ण नातेसंबंध आणि भाऊ आणि नातेवाईकांनी दुर्लक्ष केल्याने त्याला प्रचंड नैराश्य आले होते. तो मानसोपचाराची औषधे खात होता.

२०१९ मध्ये प्रेमजी त्याची आई, भाऊ आणि बहिणींसोबत इराणला गेला होता. जेथे त्याने फास्ट फूडचा व्यापार सुरु केला. त्याच्या दोन बहिणी अविवाहित आहे. २०२५ मध्ये तो पुण्याला परतला. आरोपीच्या जबानीनुसार त्याचे आजोबा शिया समुदायातील कठोर परंपरेच्या विरोधात मोहीम राबवत होते. ज्याचा परिणाम त्याच्या विचारांवर झाला होता.

आरोपी मोहरमची वाट पहात होता..

२०२५ मध्ये पुण्याला गेल्यानंतर प्रेमजी मोहरमच्या कार्यक्रमाची वाट पाहात होता. त्याने कथितपणे या हल्ल्याची योजना खूप आधीच तयार केली होती. ऑनलाईन पद्धतीने कॅप्सुल बनवण्यास शिकला आणि युट्युब व्हिडीओ पाहून त्याने घरातच झिक फॉस्फाईड या उंदराच्या विषाच्या सुमारे ३० हजार कॅप्सुल तयार केल्या.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in