• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Photo : गाढव लेकाचे… एका रात्रीत 16 गाढवांची चोरी, अदृश्य वाहन आलं अन्….

August 6, 2026 by admin Leave a Comment


पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे कुंभार समाजातील गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली असून, चोरट्यांच्या काही हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

माती वाळू आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबांची ही गाढवे चोरीला गेली आहेत. गाढवांचा शोध घेत असताना मालकांना तहसील रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यामध्ये काही अज्ञात व्यक्ती आयशर प्रकारच्या मालवाहू वाहनात गाढवे भरताना दिसत आहेत.

माती, वाळू आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबांची ही गाढवे चोरीला गेली आहेत. गाढवांचा शोध घेत असताना मालकांना तहसील रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यामध्ये काही अज्ञात व्यक्ती आयशर प्रकारच्या मालवाहू वाहनात गाढवे भरताना दिसत आहेत.

मात्र वाहन अंधारात असल्याने त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्यामुळे चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरी झालेल्या गाढवांमध्ये अंबादास छगन रोकडे यांची 5 रोहिदास सुभाष पंजावाले यांची 5 अक्षय सुभाष दिल्लीवाले यांची 3 विनोद बबन पंजावाले यांची 2 आणि अनिल भारत रोकडे यांचे 1 अशा एकूण 16 गाढवांचा समावेश आहे.

मात्र, वाहन अंधारात असल्याने त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्यामुळे चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरी झालेल्या गाढवांमध्ये अंबादास छगन रोकडे यांची 5, रोहिदास सुभाष पंजावाले यांची 5, अक्षय सुभाष दिल्लीवाले यांची 3, विनोद बबन पंजावाले यांची 2 आणि अनिल भारत रोकडे यांचे 1 अशा एकूण 16 गाढवांचा समावेश आहे.

चोरी झालेल्या गाढवांची अंदाजे किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच हिरावले गेले असून पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेली गाढवे परत मिळवून द्यावीत अशी मागणी गाढव मालकांनी केली आहे.

चोरी झालेल्या गाढवांची अंदाजे किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच हिरावले गेले असून पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेली गाढवे परत मिळवून द्यावीत अशी मागणी गाढव मालकांनी केली आहे.

या घटनेनंतर परिसरातील गाढव मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपली गाढवे आता घरासमोरच बांधून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेनंतर परिसरातील गाढव मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली गाढवे आता घरासमोरच बांधून ठेवण्यास सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in