• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Petrol Diesel Price Today : आज खिशावर किती पडणार भार ? पेट्रोल-डिझेलचे तुमच्या शहरात भाव किती ? जाणून घ्या एका क्लिकवर

May 27, 2026 by admin Leave a Comment


जागतिक अशांतता, तणाव, इंधनाची टंचाई, या सर्व पार्श्वभूमीवर सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOCL) गेल्या 12 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरातं थोडीथोडी करत वाढ केली, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांन बसल्याचे दिसत आहे. अर्ध्या महिन्याच्या आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ झाल्याने लोकांच्या खिशाला कात्री बसली असून त्यांचं बजेट कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आज, 27 मे रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. पण आज इंधनाच्या किमती स्थिर राहिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा कमी आहेत. सकाळी 6 वाजता अपडेट केलेल्या ताज्या यादीनुसार, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती आज पूर्णपणे स्थिर आहेत.

गेल्या दोन आठवड्यांचा आलेख पाहिला तर, त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम झाला आहे. या काळात तेलाच्या किमती चार वेळा वाढल्या, ज्यामुळे लोकांना रोजच दरवाढीची भीती सतावू लागली. आपण ही आकडेवारी पाहिली तर 15 मे रोजी सर्वात मोठी दरवाढ झाली, त्यादिवशी दरांत प्रति लिटर 3 रुपयांची थेट वाढ झाली. यानंतर, 19 मे रोजी सुमारे 90 पैशांची, तर 23 मे रोजी पेट्रोलमध्ये 87 पैशांची आणि डिझेलमध्ये 91 पैशांची वाढ झाली. पम हा ट्रेंड इथेच थांबला नाही, तर या आठवड्याच्या सुरूवातीला, सोमवार 25 मे रोजी देखील पेट्रोल 2.61 रुपयांनी आणि डिझेल 2.71 रुपयांनी महाग झालं.

देशातील मोठ्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल (₹/लीटर) डिझेल (₹/लीटर)
दिल्ली 102.12 95.20
मुंबई 111.21 97.83
कोलकाता 113.51 99.82
चेन्नई 107.77 99.55
लखनऊ 102.05 99.28
डेहराडून 100.20 97.10
जयपुर 112.66 97.78
पाटणा 112.70 99.87
चंदीगड 101.53 89.63
भोपाळ 114.65 99.74
रायपुर 107.96 101.17

 

तुमच्या शहरातील रेट किती ? एका मेसेजने थेट कळेल माहिती

जर तुम्हाला तुमच्या शहरातील लेटेस्ट दर किंवा किंमत दररोज सकाळी घरबसल्या तपासायची असेल, तर हे खूप सोपं आहे. इंडियन ऑइल (IOC) चे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर ‘RSP’ असा एसएमएस पाठवू शकतात. त्याचप्रमाणे, बीपीसीएलचे ग्राहक हे 9223112222 या क्रमांकावर ‘HPPRICE’ असा मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात. आणि HPCL च्या ग्राहकांसाठी 9222201122 हा नंबर देण्यात आला असून ते या नंबरवर HPPRICE असं लिहून पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर तपासू शकतात. हे सिटी कोड तुम्हाला तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मिळतील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut: रिक्षावाल्यांना मारतो, तसं नार्वेकरांना मारायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या मराठीवरून संजय राऊतांचा खरमरीत टोला
  • शशांक केतकरची लोकप्रिय मालिका 4 वर्षांनंतर घेतेय प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
  • Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून…
  • Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
  • Mumbai Rain Photos : पहिल्याच पावसात मुंबईचे 12 वाजले, कुठे काय घडलं, त्यावर मारा नजर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in