• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Petrol diesel price today : अखेर तेच घडलं… तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? पटापट करा चेक

June 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोो आणि या घडामोडीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 95 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. देशातील सामान्य जनतेसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणदे, सध्या तरी इंधनांच्या दरांमध्ये देशांतर्गत कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेनंतरही, भारतातील पेट्रोलचे दर जागतिक सरासरी आणि आपल्या शेजारील देशांमधील दरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहेत.

जगाच्या तुलनेत भारतात पेट्रोल स्वस्त

जागतिक आकडेवारीवर बारकाईने नजर टाकली तर, ग्राहकांच्या दृष्टीने भारताची स्थिती सध्या खूप चांगली असल्याचं दिसून येतं. जागतिक पेट्रोल दरांबाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या जगभरात पेट्रोलची सरासरी किंमत प्रति लिटर सुमारे 144.36 रुपये इतकी आहे. याउलट, भारतात पेट्रोलची सरासरी किंमत साधारणपणे 108.71 रुपयांवर स्थिर आहे. याचाच अर्थ असा की, सामान्य भारतीय नागरिकाला जागतिक सरासरी दरापेक्षा साधारण 36 रुपये कमी दराने पेट्रोल मिळत आहे. शिवाय, आपल्या शेजारील सातही देशांमधील—पाकिस्तान (129.47७), श्रीलंका (139.72) नेपाळ ( 135.74), बांगलादेश (112.94), चीन (126.34), म्यानमार (133.28८) आणि भूतान (109.73)— असे दर आहेत, म्हणजेच या देशात इंधनाचे दर भारताच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त आहेत.

देशातील प्रमुख शहरात आज इंधनाचे दर किती ?

भारतीय तेल कंपनी ‘आयओसी’ (IOC) ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज देशभरातील प्रमुख शहरांमधील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही नवीन वाढीचा सामना करावा लागणार नाही. राजधानी दिल्लीमध्ये सध्या सामान्य पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये आहे. तर आर्थिक राजधानीत एक लीटर पेट्रोल हे 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये इतके आहे. त्याचप्रमाणे, चेन्नईमधील लोकांा 1 लिटर पेट्रोलसाठी 107.77 रुपये तर डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामधील पेट्रोलचा दर 113.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 99.82 रुपये प्रति लिटर इतका आहे.

शहर पेट्रोलचे दर (रुपये/लीटर) डिझेलचे दर (रुपये/लीटर)
दिल्ली 102.12 95.20
कोलकाता 113.51 99.82
मुंबई 111.21 97.83
चेन्नई 107.77 99.55
नोएडा 102.12 97.56
चंदीगड 101.51 89.47
लखनऊ 101.89 95.36
पाटणा 113.37 99.36
रांची 105.26 100.49
भोपाळ 114.57 99.64

SMS वरून जाणून घ्या लेटेस्ट दर

जर तुम्ही इंडियन ऑईलचे (IOC) ग्राहक असाल तर तुमच्या मोबाईलवरून RSP टाइप करून तो मेसेज 9224992249 वर पाठवा. तर भारत पेट्रोलियम (BPCL) चे ग्राहक 9223112222 या नंबरवर, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) चे ग्राहक 9222201122 या नंबरवर HPPRICE असं लिहून आपला मेसेज पाठवून इंधनाचे दर जाणून घेऊ शकतात. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या शहराचा कोडही नमूद करावा लागेल. वेबसाईट्सवर हा कोड सहज उपलब्ध होतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in