• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Peddi Box Office : दुसऱ्या वीकेंडला ‘पेद्दी’ची बंपर कामगिरी, जान्हवी कपूर-राम चरणच्या फिल्मचा विदेशातही जलवा, किती कमाई ?

June 15, 2026 by admin Leave a Comment


Peddi Box Office Collection Day 11 : साउथ सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असलेला पेद्दी’ (Peddi) या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 11 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या झालेल्या या चित्रपटाने 300 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाला देशभरात तसेच विदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून जागतिक स्तरावर पिक्चरची सॉलिड कमाई आहे. 11 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी, या चित्रपटाने आणखी चांगली कामगिरी केली आणि बॉक्स ऑफिसवर दमदार निकाल दिसून आले. पेद्दीने 11 व्या दिवशी 9.20 कोटी रुपयांची कमाई केल्याने चित्रपटाच्या गल्ल्यात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाने 22.45 कोटी रुपयांची कमाई केली.

‘सॅकनिल्क’च्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे 11 दिवसांतील नेट कलेक्शन 216 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर एकूण (ग्रॉस कलेक्शन) 256.23 कोटी झालं. परदेशातील कामगिरीचा विचार करता, चित्रपटाने 11 व्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर 75 लाख रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याचे परदेशातील एकूण संकलन 51.75 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, या चित्रपटाची जगभरातील कमाई 307.98 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जर चित्रपटाची कमाईची सध्याची गती अशीच कायम राहिली, तर तो आगामी आठवड्यातच आपला खर्च (बजेट) वसूल करू शकेल.

500 कोटी कमावणार पेद्दी ?

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, तो700 ते 800 कोटी रुपयांची कमाई करेल आणि 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचं टार्गेट ठेवेल असं वाटत होतं. अगदी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतरही, हा चित्रपट 1000 कोटी रुपयांच्या कमाईपर्यंत पोहोचण्यास सक्षम वाटत होता. तरीही, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी (वीकेंडला) चित्रपटाने काही प्रमाणात कमाई केली असली, तरी ती आकडेवारी चित्रपटाला 700 कोटी रुपयांचा टप्पा किंवा त्यापलीकडे नेण्यासाठी पुरेशी नाही. असे असले तरी, जर वीकेंडला बॉक्स ऑफिसवर अशाच प्रकारे अनपेक्षित कामगिरी सुरू राहिली, तर पेद्दी चित्रपटाची एकूण कमाई नक्कीच 500 कोटींपर्यंत सहज पोहोचू शकते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in