• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Peddi : रामचरण-जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’वर मात

June 5, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित 'पेड्डी' हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्याची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार 'पेड्डी'ने पहिल्याच दिवशी जगभरात कमाईचा तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार रेला आहे.

साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित 'पेड्डी' हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे, त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्याची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार, 'पेड्डी'ने पहिल्याच दिवशी जगभरात कमाईचा तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार रेला आहे.

या छप्परफाड कमाईसह रामचरणचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी यशस्वी ठरला आहे. मात्र हिंदी भाषेत या चित्रपटाची कमाई कमी झाल्याचं पहायला मिळालं. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या दिवशी 'पेड्डी'ने 12412 शोजमधून तब्बल 51 कोटी रुपये कमावले आहेत. तर पेड प्रीव्ह्यू शोजच्या कमाई मिळून हा आकडा 69.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन 82.49 कोटी रुपये इतकं झालं आहे.

या छप्परफाड कमाईसह रामचरणचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी यशस्वी ठरला आहे. मात्र हिंदी भाषेत या चित्रपटाची कमाई कमी झाल्याचं पहायला मिळालं. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी 'पेड्डी'ने 12,412 शोजमधून तब्बल 51 कोटी रुपये कमावले आहेत. तर पेड प्रीव्ह्यू शोजच्या कमाई मिळून हा आकडा 69.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन 82.49 कोटी रुपये इतकं झालं आहे.

'पेड्डी'ला केवळ भारतातच नाही तर परदेशातच दमदार प्रतिसाद मिळतोय. परदेशात या चित्रपटाने 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जगभरातील कमाईचा एकूण आकडा 112.49 कोटी रुपये इतका झाला. रामचरण आणि जान्हवी कपूर यांचा 'पेड्डी' हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर सर्वाधिक कमाई मूळ तेलुगू भाषेमध्ये झाली.

'पेड्डी'ला केवळ भारतातच नाही तर परदेशातच दमदार प्रतिसाद मिळतोय. परदेशात या चित्रपटाने 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जगभरातील कमाईचा एकूण आकडा 112.49 कोटी रुपये इतका झाला. रामचरण आणि जान्हवी कपूर यांचा 'पेड्डी' हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर सर्वाधिक कमाई मूळ तेलुगू भाषेमध्ये झाली.

रामचरणच्या या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. यामध्ये रणवीर सिंहचा 'धुरंधर' सनी देओलचा 'गदर 2' आणि शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट आहे. धुरंधरने पहिल्या दिवशी 30 कोटी गदर 2 ने 40 कोटी आणि पठाणने 57 कोटी रुपये कमावले होते.

रामचरणच्या या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. यामध्ये रणवीर सिंहचा 'धुरंधर', सनी देओलचा 'गदर 2' आणि शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट आहे. धुरंधरने पहिल्या दिवशी 30 कोटी, गदर 2 ने 40 कोटी आणि पठाणने 57 कोटी रुपये कमावले होते.

'पेड्डी' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशच्या 1980 च्या दशकावर आधारित आहे. गावातील एक व्यक्ती खेळाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणतो आणि त्याच्याविरोधात एक पॉवरफुल खलनायक उभा असतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन बुची बाबू सनाने केलं आहे. यामध्ये रामचरण आणि जान्हवीशिवाय बोमन इराणी शिवा राजकुमार जगपती बाबू आणि दिव्येंदू यांच्याही भूमिका आहेत.

'पेड्डी' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशच्या 1980 च्या दशकावर आधारित आहे. गावातील एक व्यक्ती खेळाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणतो आणि त्याच्याविरोधात एक पॉवरफुल खलनायक उभा असतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन बुची बाबू सनाने केलं आहे. यामध्ये रामचरण आणि जान्हवीशिवाय बोमन इराणी, शिवा राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदू यांच्याही भूमिका आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in