• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PCB: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी केली मोठी गडबड, पीसीबी बंदी घालण्याच्या तयारीत

August 5, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान क्रिकेट, क्रिकेटर्स आणि पीसीबी यांच्यात रोज काही ना काही वाद होत असतात. कधी खेळाडू, तर पीसीबी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. असंच प्रकरण आता समोर आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी क्रिकेपटूंवर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी केली आहे. यात वेगवाने गोलंदाज मोहम्मद इरफानसह काही माजी दिग्गज क्रिकेटपटूंची नावं आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू जाम्बियातील लुसाकामध्ये एक अनधिकृत स्पर्धा खेळल्याने पीसीबीचा संताप झाला आहे. त्यामुळे माजी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्याची तयारी केली आहे. पीसीबीने जाहीरपणे सांगितलं आहे, आशियाई लीजेंड्ससारख्या अनधिकृत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यात मान्यताप्राप्त विदेश लीग खेळण्यावर दोन वर्षांच्या बंदीचा समावेश आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंचे धाबे दणाणले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं काय आहे म्हणणं?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंना पुढचे दोन वर्षे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत, प्रशिक्षण, सल्लागार, मार्गदर्शक किंवा इतर कोणत्याही पदावर काम करता येणार नाही.’ सूत्रांच्या माहितीनुसार, या लीगमधील पाकिस्तान पँथर्स संघात अनेक पाकिस्तानी खेळाडू सहभागी होण्यासाठी आले होते. पण ही लीग अनधिकृत असल्याचं समजताच नावं मागे घेतली.

एशियन लीजेंड्स लीग काय होती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आशियाई देशांचे स्टार खेळाडू यात खेळणार होते. यात इंडियन रॉयल्स, पाकिस्तान पँथर्स, श्रीलंका लायन्स, बांग्लादेश टायगर्स, अफगाणिस्तान पठाण आणि एशियन स्टार्स असे सहा संघ होते. शिखर धवन, सुरेश रैना, हरभजन सिंह, मोहम्मद हाफीझ आणि थिसारा परेरा यांसारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.पण अवघ्या काही दिवसांतच ही स्पर्धा विस्कळीत होऊन रद्द करण्यात आली.

पाकिस्तानी खेळाडूंची धावाधाव

या लीग संदर्भात गोंधळ झाल्यानंतर मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, वहाब रियाझ, सोहेल तनवीर आणि उमर अकमल यांनी नावे मागे घेतली. तर मोहम्मद इरफान, इम्रान नझीर, तौफिक उमर, राहत अली, यासिर शाह, झाहिद महमूद, हसन रझा आणि इब्रार हुसेन यांनी 31 जुलैला एक सामना खेळला. त्यामुळे भाग घेतलेल्या खेळाडूंवर कारवाई होऊ शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in