• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PBKS vs RR Toss : राजस्थानचा बॉलिंगचा निर्णय, पंजाबसाठी कॅप्टन श्रेयस अय्यर किती धावा करणार?

April 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 39 व्या सामन्यात आज 28 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थानचा नववा तर पंजाबचा आठवा सामना आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. रियान पराग याने बॉलिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

पंजाबने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. शशांक सिंह आणि झेव्हीयर बार्टलेट या दोघांच्या जागी सूर्यांश शेडगे आणि लॉकी फर्ग्यूसन यांचा समावेश करण्यात आला आहे. तर शिमरॉन हेटमायर आणि रवी बिश्नोई यांच्या जागी दासून शनाका आणि यश राज पुंजा याचा समावेश करण्यात आला आहे.

आयपीएल स्पर्धेत 2025 पासून या मैदानात एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. या 10 पैकी 6 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 4 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, सूर्यांश शेडगे, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
  • Pankaja Munde | मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून रद्द
  • MI vs SRH : पराभवाची मालिका रोखण्यासाठी पलटणमध्ये बदल निश्चित, ओपनरचा पत्ता कट! प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी?
  • MI vs SRH : हैदराबाद नवव्या सामन्यासाठी सज्ज, पलटण विरुद्ध परतफेड करण्याची संधी, मुंबई कमबॅक करणार?
  • GK : कोलकातात पोलिसांच्या वर्दीचा रंग पांढरा का ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in