
आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची 19 व्या मोसमात वाईट स्थिती झाली आहे. मुंबईला आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईसमोर मोहिमेतील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतेय. त्यामुळे वानखेडेत पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी पलटण मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित समजले जात आहेत. या निमित्ताने मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल हे जाणून घेऊयात.
Leave a Reply