
पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती नंतर आता दिवंगत नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु आहे. पण अनेकांना प्रश्न पडला आहे की पार्थ पवार यांचा साखरपुडा कुठे आहे? या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आहे?
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार यांच्या साखरपुड्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण या हॉटेलचे नाव काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही.
पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला राष्ट्रवादी पक्षातील सगळे आमदार खासदार आणि मोजक्या माजी आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
कुटुंबातील सदस्य आणि नेतेमंडळी असे 200 ते 250 लोकांमध्ये पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडणार आहे. पार्थ पवार हे अभिनेत्री कायनात धारशी लग्न करणार आहेत. त्यांच्या साखरपुडा 29 जुलै रोजी पार पडणार आहे.




Leave a Reply