• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Spy : बिट्टू पाकिस्तानला विकला गेला, देशासोबत गद्दारी, हाय वे प्लानचा पर्दाफाश

May 22, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानचं हेरगिरीचं आणखी एक कारस्थान उघड झालं आहे. यात आपल्याच माणसाने देशासोबत गद्दारी केली. गाजियाबाद, फरीदाबादनंतर आता पठाणकोटमध्ये कॅमेर लावून हेरगिरी सुरु असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलासंबंधीची माहिती पाकिस्तानात पोहोचवत होता. येणार्‍या, जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या ताफ्यावर लक्ष ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं. दुकानात बसवलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो ही माहिती पाकिस्तानात पोहोचवत होता.

पठाणकोट SSP दलजिंदर सिंह ढिल्लो यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. बलजीत सिंह उर्फ बिट्टू असं त्याचं नाव आहे. ढालीवाल गावात तो रहायला होता. आरोपी बिट्टूने सुजानपूर जवळ नॅशनल हायवे 44 वर CCTV कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सैन्याच्या ताफ्यावर लक्ष ठेवलं जायचं. सर्व फुटेज इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि परदेशात बसलेल्या हँडलर्स पर्यंत पोहोचवली जायची.

हे लाइव्ह फुटेज सीमेपार पाकिस्तानात हँडलर्सना मिळायचं

पठाणकोट पोलिसांच्या CIA म्हणजे गुन्हे तपास यंत्रणेला चौकशी दरम्यान या नेटवर्क बद्दल समजलं. आरोपी बिट्टू पोलिसांच्या ताब्यात आहे. बलजीत सिंह ऊर्फ बिट्टूने सुजानपूर येथे पुल नंबर 4 आणि 5 दरम्यान दुकानामध्ये CCTV कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यावर त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलाच्या ताफ्यांची रेकॉर्डिंग व्हायची. हे लाइव्ह फुटेज सीमेपार पाकिस्तानात हँडलर्सना मिळायचं. या केसमध्ये बलजीत सिंह शिवाय तीन अन्य आरोपी सुद्धा आहे. पठाणकोटचे SSP दलजिंदर सिंह ढिल्लो यांनी ही माहिती दिली. पठाणकोटमध्ये भारतीय सैन्याचा, एअरफोर्सचा तळ आहे. विक्रमजीत सिंह उर्फ विक्का, बलविंदर सिंह उर्फ विक्की आणि तरणप्रीत सिंह उर्फ टन्नू अशी या तिघांची नावं आहेत.

संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवायचा

काही दिवसांपूर्वी गाजियाबादमध्ये असंच प्रकरण उघड झालं होतं. अनेक भागात सोलार कॅमेरे बसवून त्याचा एक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवला होता. NIA ने आपल्या चौकशी अहवालात पाच अल्पवयीन आरोपींची नावं नोंदवली. पाकिस्तान या कॅमेऱ्याच्या माध्यमातून भारतातील संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवायचा. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्लान बनवलेला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in