
मुस्लिम कार्ड खेळून पाकिस्तान अनेक देशांना आपल्यासोबत जोडत आहे. सौदी अरेबिया, तुर्की या देशांना मक्का करारामधून पाकिस्तानने आपल्या सोबत जोडलं आहे. युरोपियन नाटोसारखी मुस्लिम देशांची आघाडी बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. खासकरुन भारताने आक्रमण करण्याचं पुन्हा धाडस दाखवू नये यासाठी पाकिस्तानचं हे सर्व चाललं आहे. पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानसोबत उभा असलेला तुर्की आता भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर देत आहे. हा पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्डमार्शल असिम मुनीर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासाठी हा धक्का आहे. कारण तुर्कीसोबत आपले खूप घनिष्ठ संबंध आहेत, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा नेहमीच प्रयत्न असतो. पण तोच तुर्की आता भारताच्या जवळ येत आहे.
तुर्की भारताच्या जवळ येण्यामागे आर्थिक पासून इतर अशी बरीच कारणं आहेत. तुर्कीला SCO शांघाय सहकार्य संघटनेचं पूर्णवेळ सदस्य बनायचं आहे. असं झाल्यास SCO मध्ये अजून एका नाटो देशाची एन्ट्री होईल. जून महिन्यात तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकन फिदान म्हणालेले की, “भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. भारताला आमच्या देशाची सीमा लागत नाही. आमच्यात कुठलाही द्विपक्षीय मुद्दा नाहीय. भारतासोबत आमचे वाईट संबंधही नव्हते”
काही खास मुद्यांवर एकजूट
भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यामागे अनेक कारणं आहेत. पाकिस्तानसोबत चांगले संबंध असलेला तुर्की एकच देश नाही. काही खास मुद्यांवर एकजूट आहे. “आमचे रशिया आणि अमेरिकेसोबतही काही मुद्यांवर मतभेद आहेत. काही युरोपियन देशांसोबत मतभेद आहेत. पण आम्ही नकारात्मक मुद्दे मागे ठेऊन सकारात्मकतेने पुढे जात आहोत” असं हाकन फिदान म्हणाले.
भारताने याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये
“भारत आणि तुर्कीमध्ये असेच संबंध असावेत अशी आमची भूमिका आहे. कारण सहकार्य करण्यासाठी आमच्याकडे बरचं काही आहे. त्या दिशेने जाण्यासाठी आपण परिपक्वता दाखवू शकतो. द्विपक्षीय स्तरावर संबंध ठेवण्यासाठी आम्हाला काही अडचण नाहीय. भारताने याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये असं आम्ही आवाहन करतो” असं हाकन फिदान यांनी सांगितलं.
म्हणून भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न
तुर्कीला भारतात व्यवसाय, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्याशिवाय भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने तुर्की फिरायला जातात. तुर्की भारताला मार्बल, मशीनरी आणि शेतीशी संबंधित वस्तूंची निर्यात करतो. तुर्कीसाठी पाकिस्तानपेक्षा बिझनेस जास्त महत्वाचा आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे. म्हणून तुर्की भारतासोबत चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न करतोय.
Leave a Reply