
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानने धारदार बॉलिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 8 ओव्हरआधीच (Pakistan vs Australia 3rd Odi) ऑलआऊट केलं. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचं 42 ओव्हरमध्ये 157 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे पाकिस्तानला विजयसाठी 158 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. आता पाकिस्तान सहज सामन्यासह मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार की कांगारु 157 धावांचा यशस्वी बचाव करत सीरिज आपल्या नावावर करणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.
Leave a Reply