Bacchu Kadu : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात बरंच काही घडून गेलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. सध्या बच्चू कडू हे आमदार आहेत. ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा उभी फूट पडली आहे. त्यांच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. […]
Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार, आएमडीकडून या वर्षीचा सुधारीत अंदाज जारी
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे, जून महिन्यामध्ये पावसात मोठा खंड पडला होता, त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र आता गुड न्यूज समोर आली आहे. मंगळवारपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभाग ( IMD) […]
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत… पहिली प्रतिक्रिया समोर
अलीकडील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गटातील पक्षफुटीची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशात ठाकरे गटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटातील नेते म्हणून अरविंद सावंतर यांनी लोकसभा अध्यक्षांची ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत काय […]
IND vs IRE : टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध होणार खास डेब्यू, 9 क्रिकेटपटूंबाबत काय?
टीम इंडियाने अफगाणिस्तानचा मायदेशात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्ये सुपडा साफ केला. त्यानंतर आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 26 जूनपासून 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या आयर्लंड दौऱ्यासाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. या 15 पैकी 6 खेळाडू असे आहेत […]
उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता दोनच दिवसांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील एका नगराध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत […]
मोठी बातमी! एक मोठी चूक झालीच, 6 बडंखोर खासदार होणार अपात्र? ठाकरेंनी फिरवला गेम, आता थेट…
शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जेव्हा एखाद्या पक्षातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश ग्राह्य धरला जातो, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही, तसेच त्यांना लोकसभा अध्यक्षांकडून स्वतंत्र गटाची देखील मान्यता मिळते. […]