प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : दिल्लीसह संपूर्ण देशात नीट परीक्षेतील घोळावरून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाला तर हिंसक वळण लागलं. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष […]
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत. साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत. सरकारने […]
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमनेसामने आले. त्यानंतर झालेल्या लाठीचार्जमुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर […]
दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशातच आता या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ही बाब समोर आणल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे खाते पुन्हा सुरू करण्यात आले […]
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
Akhil Chitre : सध्या देशात सर्वत्र कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाची चर्चा आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्यातील प्रमुख शहरांत विरोधी पक्षांनी आंदोलन, मोर्चाचे आयोजन केले आहे. अहिल्यानगरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उपोषणाची हाक दिली आहे. दुसरीकडे 24 जुलै रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईत तिरंगा रॅलीचे आयोजन […]
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेच्या विधानाने खळबळ
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमार नंतर काल पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं होतं. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. राहुल […]