
Rohit Sharma Padma Shri Award: केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी रोजी 131 पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. यापैकी 66 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार दिले गेले. या यादीत काही दिग्गज खेळाडूंची नावंही होती. यात क्रिकेटपटू रोहित शर्माचं नाव होतं. पण या पुरस्कार सोहळ्यात कुठेच दिसला नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा या पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचं कारण आता पुढे आलं आहे. त्याचं असं की, पद्म पुरस्कार विजेत्यांना वेगवेगळ्या टप्प्यात सन्मानित केलं जातं. या टप्प्यात पहिल्या 66 जणांचा गौरव करण्यात आलं. राष्ट्रपतींनी पहिल्या टप्प्यात 2 पद्म विभूषण, 6 पद्म भूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार दिले. यात महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा गौरव करण्यात आला.
रोहित शर्मा पहिल्या टप्प्यात वेळापत्रक व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार घेण्यासाठी येऊ शकतो. पद्म पुरस्कारांचं काही टप्प्यात वितरण केलं जातं. राष्ट्रपती भवनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात याचं आयोजन केलं जातं. ज्यांना पहिल्या तारखेला वेळ मिळत नाही त्यांना पुढच्या तारखेला बोलवलं जात. रोहित शर्माचं असंच आहे. रोहित शर्माचं आयपीएल 2026 स्पर्धेच्या दृष्टीने वेळापत्रक व्यस्त होतं. जर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असता तर त्याला शक्यच झालं नसतं. पुरस्काराची तारीख आणि वेळ काही दिवसांआधीच ठरते. त्यामुळे कदाचित रोहित शर्माने आयपीएल व्यस्त वेळापत्रक पाहून पुढची वेळ घेतली असेल.
आयपीएल 2026 स्पर्धेत रोहित शर्मा 14 पैकी 9 सामन्यात खेळू शकला. कारण दुखापतीमुळे काही सामन्यात त्याला खेळता आलं नाही. रोहित शर्माने 9 सामन्यात 35.38 च्या सरासरीने 283 धावा केल्या. या स्पर्धेत त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. दुसरीकडे, साखळी फेरीतच मुंबई इंडियन्सला गाशा गुंडाळावा लागला. आता जूनमध्ये रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसेल. पण या मालिकेत पूर्ण फिट असेल तर आणि तरच भाग घेईल. त्यासाठी पहिल्यांदा बीसीसीआयची फिटनेस टेस्ट पास करावी लागेल.
Leave a Reply