
IPL 2026 Orange Cap Holder: आयपीएल 2026 मध्ये 43 सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यादरम्यान नारंगी रंगाच्या टोपीसाठी मोठा उलटफेर दिसला. एका स्टार फलंदाज कानामागून येऊन तिखट झाला आहे. हा तडफदार फलंदाज अचानक क्रमांक 1 वर आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल याने हा करिष्मा केला आहे. त्याने 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरोधात 75 धावांची खेळी करून विजयाला गवसणी घातली. त्यासोबतच त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला.
केएल राहुलच्या 433 धावा
उजव्या हाताने खेळणारा सलामीवीर केएल राहुल या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 433 धावा केल्या आहेत. राहुल याचा या हंगामात सरासरी 54.12 आणि स्ट्राइक रेट 185.84 इतका राहिला आहे. त्याने या आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 चौकार आणि 24 षटकार ठोकले आहेत. राहुल या हंगामात आतापर्यंत चार वेळा अर्धशतकाहून अधिकची खेळी खेळला आहे. यामध्ये त्याची पंजाबविरोधातील नाबाद 152 धावांचा सुद्धा समावेश आहे. केएल राहुल याने ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, हेनरिक क्लासेन या दमदार फलंदाजांना मागे टाकले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय
या हंगामाच्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्स संघाला 7 गड्यांनी पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत 225 धावांचा डोंगर उभा केला. धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुल (75) आणि निसंका (62) या दोघांच्या दमदार खेळीवर हा विजय 5 चेंडू शिल्लक असतानाच मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही दिल्लीने केला. हा विजय खेचून आणत दिल्लीने आता मैदान दूर नाही असे दाखवून दिले. दिल्ली संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स विजयासाठी झुंजत आहे, पण लवकरच संघ गुणतालिकेत मोठी बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्स चमकत्कार दाखवणार?
IPL 2026 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सची (DC) टीम आतापर्यंत 9 सामन्यात 4 वेळा जिंकली आहे. तर 5 वेळा हारली आहे. दिल्लीचा संघ 8 अंकसह या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रनरेट -0.895 इतका आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार का असा सवाल विचारल्या जात आहे.
Leave a Reply