• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग

June 21, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला बंडखोर खासदारांमध्ये त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल झाले असून गोवर्धनवाडी येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या आगमनापूर्वीच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक परिसरात जमले होते. गोवर्धनवाडी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

दरम्यान, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

धाराशिवमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेले असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ओमराजे यांनी ठाकरे गटासोबतच राहावे, अशी मागणी केली. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्तेही सक्रिय झाले असून ओमराजेंच्या समर्थनार्थ बॅनर झळकवण्यात आले आहेत.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ओमराजे निंबाळकर ठाकरे गटात राहणार की शिंदे गटात जाणार, याचा निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष सध्या धाराशिवकडे लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक
  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल
  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in