• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना…

June 28, 2026 by admin Leave a Comment


धाराशिवमध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन केले. त्यानंतर ते धाराशिवकडे रवाना झाले आहेत. मतदारसंघात परतल्यानंतर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवलं आहे. त्यामुळे आगामी राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी बैठक घेण्याचं ठरवलं की काय? अशाही चर्चा आहेत.

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींना आणखी वेग येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ही रोमँटिक थ्रिलर सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये; 12 हजार कोटी कमावलेल्या सिनेमालाही टाकलं मागे
  • भयंकर! शेजाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
  • गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मिळून फसवलं; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा खुलासा, 16 वर्षांनंतर सांगितलं सत्य
  • Success Story: मुंबईतील AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये
  • बोल्ड अभिनेत्रीचं नवीन गाणं चर्चेत, अंजली अरोराच्या टॉवेल डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष, Video पाहून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in