• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Omkar Karve: थर्ड क्लास माणूस, लाथाबुक्क्यांनी मारतो तो..; मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप

August 30, 2026 by admin Leave a Comment


मराठी मालिकांमधील अभिनेता ओमकार कर्वे सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेल्या ओमकारने इंडस्ट्रीतील त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना एका निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव मात्र त्याने जाहीर केलेलं नाही. मात्र सेटवरील वातावरण, कलाकार आणि तंत्रज्ञांना मिळणारी वागणूक याबाबत त्याने अनेक धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. “कोविडनंतरच्या काळात मी एका मालिकेसाठी काम केलं होतं. त्यावेळी सेटवरील काही कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत मी आक्षेप घेतला होता. काही तंत्रज्ञांना जेवणामुळे त्रास होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. या परिस्थितीबद्दल मी आवाज उठवला आणि कलाकार, तंत्रज्ञांना किमान चांगलं जेवण मिळावं, अशी भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निर्मात्यांनी थेट मला प्रोजेक्टपासून दूर करण्याचा निर्णय घेतला,” असा आरोप ओमकारने केला आहे.

मालिकेतून अचानक काढलं

यानंतर साधारण दोन वर्षांपूर्वी दुसऱ्या मालिकेत काम करताना ओमकारला वेगळाच अनुभव आला. संबंधित निर्मात्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील एका वक्तव्यामुळे संबंधित व्यक्ती नाराज झाल्याचा आणि मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचा खुलासा ओमकारने केला. यावेळी ओमकारने सेटवरील एक प्रसंगही सांगितला. बाथरूममध्ये प्रकाश कमी असल्याने त्याने स्वतःच्या पैशाने अधिक प्रकाश देणारा बल्ब आणण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, यावरही निर्मात्याने त्याला फोन करून नियमांचा दाखला दिल्याचं तो म्हणाला. साधी सुविधा मागितली असतानाही त्यावरून वाद निर्माण झाला, असं त्याने सांगितलं.

ओमकारने सेटवरील जेवण आणि चहाच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. “कलाकारांना मर्यादित जेवण दिलं जात होतं आणि चहाबाबतही काही कठोर नियम होते,” असं तो म्हणाला. तंत्रज्ञांची परिस्थिती आणखी खराब असल्याचा दावा त्याने केला. या सगळ्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या मनात नाराजी असूनही रोजगाराच्या भीतीने अनेकजण आवाज उठवत नसल्याचाही खुलासा ओमकारने या मुलाखतीत केला.

लाथाबुक्क्यांनी मारल्याचा आरोप

सर्वात गंभीर आरोप करताना ओमकारने संबंधित निर्माता केवळ शिवीगाळ करत नाही, तर लोकांना मारहाणही करतो, असा दावा केला. नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांनी अशा वातावरणात काम करण्याची सवय लावून घेऊ नये, यासाठी अनुभवी कलाकारांनी बोलण्याची गरज असल्याचं त्याने सांगितलं.

ओमकार कर्वे याने हे आरोप एका मुलाखतीदरम्यान केले असून त्यात संबंधित निर्मात्याचं नाव त्याने घेतलेलं नाही. त्यामुळे त्याच्या दाव्यांवर संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्याच्या वक्तव्यामुळे मराठी मालिकाविश्वातील कामाचं वातावरण, कलाकारांशी होणारी वागणूक आणि सेटवरील शिस्त यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in