• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Numerology : या मूलांकाच्या लोकांवर सासूचा असतो भारी जीव, सासरी असतो मोठा रुबाब..

June 8, 2026 by admin Leave a Comment


न्युमरॉलॉजीवर अनेकांचा विशवास असतो. तुमच्या वाढदिवसाच्या तारखेची बेरीज करून शेवटी जो 1 अंक येतो तो तुमचा मूलांक असतो. म्हणजे तुमचा वाढदिवस एखाद्या महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला येत असेल तर त्या आकड्यांची बेरीज केल्यावर शेवटी अंक येतो 1. तोच तुमचा मुलांक. अंकशास्त्रात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचे मूलांक 2, 3 किंवा 6 असतो, ते आपल्या सासूबाईंचे मन खूप लवकर जिंकतात. त्यांचा चांगला स्वभाव आणि नात्यांप्रति असलेली निष्ठा त्यांना सासूबाईंच्या आवडतू व्यक्ती बनवते. चला तर मग, त्यांच्यातील आणखी काय खास असतं ते जाणून घेऊया

मूलांक 2

2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. चंद्राच्या ऊर्जेमुळे त्यांचा स्वभाव खूप मृदू असतो. ते इतरांच्या भावना सहजपणे समजून घेतात. यामुळे ते कुटुंबातील सर्वात प्रिय व्यक्ती बनतात.

मूलांक 3

ज्यांचा जन्म 3, 12, 21 अथवा 30 तारखेला झालेला असतो, त्यां लोकांचा मूलांक 3 असतो. हे लोक खूप आनंदी आणि मनमिळाऊ असतात. केवळ त्यांच्या उपस्थितीनेच सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण होते. ते आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करतात.

मूलांक 6

अंकशास्त्रानुसार, 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ठरतो 6. शुक्राच्या ऊर्जेमुळे, ते नात्यांना मनापासून जपतात. त्यांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नसते.

मोठ्यांचा आदर

हे तीन मूलांक असलेले लोक सहसा वडीलधाऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात, त्यांचा आदर करतात. लोकांचा आदर राखणे आणि गरजेच्या वेळी मदत करणे हे त्यांच्या स्वभावातच असते. यामुळेच ते वडीलधाऱ्यांच्या नजरेत सर्वोत्तम मानले जातात आणि त्यांच्या सासूबाईंचा त्यांच्यावर विशेष जीव असतो.

नाती कशी टिकवायची हे असतं माहीत

अंकशास्त्रानुसार, छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावण्याऐवजी, या तीन मूलांकाचे लोक नाती जपण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच ते कुटुंबात खास ठरतात.

कौटुंबिक सहवासाची ओढ

2 , 3 आणि 6 असा मूलांक असलेल्या लोकांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. ते घरात प्रेम आणि जिव्हाळा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे घरातील सर्वजण आनंदी राहतात.

हे विसरू नका

पण आपण हे समजून घेतले पाहिजे की केवळ आपला मूलांक सर्व काही ठरवत नाही. चांगली वागणूक, समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आणि आपलेपणाची भावना, हे कोणाचेही मन जिंकण्याचे सर्वात सोपे मार्ग आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in