• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Floods : नेपाळमधल्या विनाशाला चीन जबाबदार का? ऐनवेळी रियल टाइम डाटा का नाही शेअर केला?

August 27, 2026 by admin Leave a Comment


नेपाळ-चीनच्या सीमेवर 26 ऑगस्ट रोजीच्या पुराने हाहाकार माजला आहे. या भागातील विनाशकारी पुराने अनेकांचे बळी घेतले आहेत. तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या विनाशकारी महाप्रलयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. परंतु चीनला हा विनाश थांबवता आला असता, परंतु त्यांनी ऐनवेळी रियल टाइम डेटा शेअर केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नेपाळमधील पुरावरून चीनवर टीका होऊ लागली आहे. नेपाळचे पत्रकार परशुराम यांनी बुधवारी अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधला. शेजारी देशाने पुराविषयी कोणतीही पूर्वसूचना व्यवस्थित दिली नाही. या विनाशकारी पुराची कोणतीही पूर्वसूचना न देऊन बीजिंगने काठमांडू शहाराला कमकुवत केलं, असा आरोप परशुराम यांनी केला. नेपाळने आतापर्यंत अनेकदा सामोरे आलेल्या संकटाचा सामना केला आहे. अनेक संकटावर यशस्वीपणे तोडगा देखील काढला आहे. परंतु एकतर्फी प्रेमाची किंमत नेपाळने मोजावी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी पुराची घटना घडली. या घटनेत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. या पुराच्या घटनेत 133 हून भारतीयांसहित 700 जण बेपत्ता झाले आहेत. नेपाळ-चीनच्या मैत्री पुलाजवळ आणि तिबेटमध्ये अचानक पूर आला. यात अंतर २० किलोमीटर इतके आहे. तिबेटमधून येणार्‍या पुराला 20 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी बराच वेळ होता. परंतु यावेळी चीनने नेपाळला माहिती दिली. चीनने आधीच माहिती दिली असती, तर नुकसान कमी झालं असतं. चीनने नेपाळला पुराची माहिती उशीरा दिली.

नेपाळचे परराष्ट्रममंत्री शिशिर खनाल यांनीही संसदेत सांगितले की, ‘तिबेटच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.37 वाजता भूकंप झाला. त्यानंतर जवळपास तीन मिनिटांनतर अचानक पूर आल्याचे वृत्त आहे. या भूकंपामुळे हिमनदीला तडा गेल्याने पूर आला. त्यानंतर या पुराचं पाणी भोटे कोसी नदीहून तिबेटजवळील रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यात शिरलं. नेपाळ-तिबेट सीमेजवळील नदीत पाणी वाढणे आणि दरड कोसळल्याने भोटे कोशी नदीमधील पुराचं पाणी त्रिशुली नदीत पोहोचलं. पुढे नुवाकोट, चितवन, गोरखा, तनहू आणि नवलपरासी ईशान्य भागातही पुराचं पाणी शिरलं. नेपाळची राजधानी काठमांडूजडवळील जवळपास 70 किलोमीटरजवळच्या भागात पुराचं पाणी घुसलं. या घटनेने नेपाळच्या जुन्याच पुराच्ये समस्येने पुन्हा डोके वर काढलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in