• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET Paper Leak : ‘लीक पेपर’ ते ‘गॅरंटी सिलेक्शन’; NEET माफियाचा टेलिग्राम गेम अखेर उघड !

May 25, 2026 by admin Leave a Comment


नीट-यूजी 2026 (NEET-UG 2026) पेपरफुटीप्रकरणामुळे देशभरात प्रचंड खळबळ माजली. या प्रककरणाचे धागेदोर थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून आत्तापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावलं उचलली जात असून सीबीायकडून कसून तपास करण्यात येत आहे. याच खळबळजनक प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब उघडझाली आहे. या घोटाळ्यासाठी टेलिग्रॅम ॲपचा वापर करण्यात आला होता, हे तर उघड झालं होतंच पण यासाठी आरोपींची मोडस ऑपरेंडी कशी होती, विद्यार्थी , पालकांची फसवणूक कशी झाली तेही उघड झालं.

टेलिग्रामवर रचलं ‘नीट’ कांड, 60 हजारांत टोकन आणि पेपरचे लाखो रुपये

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामवर ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून शेकडो विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण फसवणूक टेलिग्रामच्या माध्यमातून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत सुमारे 5.74 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आल्याचेही उघड झालं आहे.

तयार केले वेगवेगळे ग्रुप्स

याप्रकरणी तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांकडून टेलिग्रामवर ‘लीक पेपर’,  ‘गॅरंटी सिलेक्शन’, ‘100 टक्के यश’ आणि ‘फुलप्रूफ सिस्टम’ असे काही ग्रुप तयार करण्यात आले होते. जे विद्यार्थी आणि पालक नीट परीक्षेच्या तणावाखाली होते, अशा हजारो लोकांना लक्ष्य करण्यात आलं, त्यांना या ग्रुप्समध्ये प्रवेश देण्यासाठी सुरुवातीला फक्त 200 ते 500 रुपयांची फी आकारण्यात आली.

मात्र एकदा पालकांचा विश्वास संपादन केली की त्यानंतर या सायबर गुन्हेगारांनी त्यांना 60 हजार रुपयांचे टोकन दिलं. एवढंच नव्हे तर अत्यंत महत्वाची गोष् म्हणजे, परीक्षेच्या दिवशी सकाळीच मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊ, असा दावा करत प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळण्यात आले, अशी माहितीही समोर आली आहे. अशा पद्धीतने या गुन्हेगारांनी अनेकांकडून पैसे उकळत आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये जमवल्याचे उघड झाले आहे.

विद्यार्थी आणि पालकांचीही चौकशी

दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपी मोटेगावकर तसेच अनेकांना अटक करण्यात आल्यानंतर आता सीबीआयच्या चौकशीचा वेग वाढला असून र आता या घोटाळ्याचे लाभार्थी असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या रॅकेटचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आंतरराज्य स्तरावर पसरले आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही कसून तपास सुरू आहे.

दरम्यान या पेपरफुटीप्रकरणातील अटकेतील तीनही आरोपींना आज दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुण्यातून अटक केलेली प्राध्यापक मनीषा हवालदार, पी.व्ही.कुलकर्णी आणि ब्युटीशियन मनीषा वाघमारेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in