• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET सारखाच MHT-CET मध्येही महाघोटाळा? 12 वीत 40 टक्के, सीईटीमध्ये 99 पर्सेंटाईल कसे? त्या सनसनाटी Video मधून मोठी पोलखोल?

July 28, 2026 by admin Leave a Comment


MHT-CET 2026 Scam Allegation: NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) देशभरात रान उठवले. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता राज्यात NEET पेक्षाही MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी यावर पहिले भाष्य केले. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि आता राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी या आरोपांची राळ उठवली आहे. बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यात एका शिक्षकाने एमएच-सीईटी 2026 मध्ये कसा महाघोटाळा झाला याविषयी भाष्य केले आहे. हा व्हिडिओ समोर आणत बालगुडे यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

सचिन सावंत यांचा आरोप काय?

देशात युजी-नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीनंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळला. त्याला CJP ने चेहरा दिला. देशभरात या परीक्षा घोटाळ्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जंतरमंतरवर 35 दिवसांहून अधिक काळ आंदोलन लोटले. देशात या आंदोलनाची धग पोहचताच खडबडून जागी झालेल्या मोदी सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. हे आंदोलन अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यात मोठा बॉम्ब टाकला. MH-CET परीक्षेत महाघोटाळ्याचा आरोप केला. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेंटाईल्स कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली. त्यांनी या परीक्षेच्या निकालाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांनीही या परीक्षेतील घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला.

महादेव बालगुडे यांनी एक्सवर केली पोस्ट

राष्ट्रवादीचे नेत महादेव बालगुडे यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एका शिक्षिकाचा एमएच सीईटीच्या निकालात महाघोटाळा केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये सदर शिक्षकाच्या युट्यूब चॅनलची लिंकही शेअर केली आहे. त्यात या हा घोटाळा कसा करण्यात आला यासंदर्भात कथित आरोप करण्यात आला आहे.

हे स्वतः शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला यावर त्यांचा पूर्ण व्हिडीओ खालील लिंकवर बघा. पत्रकार, शिक्षक असे अराजकीय लोक जेव्हा पुराव्यासह बोलतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. तसा तर हा घोटाळा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वात आधी उघडकीस आणला होता.https://t.co/K6RpWLr1xI pic.twitter.com/JiiHiFZtrk

— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) July 27, 2026

“हे स्वतः शिक्षक आहेत. MHT-CET घोटाळा कसा झाला यावर त्यांचा पूर्ण व्हिडीओ खालील लिंकवर बघा. पत्रकार, शिक्षक असे अराजकीय लोक जेव्हा पुराव्यासह बोलतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. तसा तर हा घोटाळा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सर्वात आधी उघडकीस आणला होता.” अशी पोस्ट बालगुडे यांनी केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांना रँक मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महा-सीईटमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. हा व्हिडिओ जवळपास 30 मिनिटांचा आहे. या व्हिडिओत या परीक्षेत कसा घोटाळा झाला याविषयीचा दावा करण्यात आला आहे. त्यात परीक्षा यंत्रणा आणि परीक्षा सेलवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. परीक्षेत  पैसे देऊन गुण वाढवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्ष आता याप्रकरणी राज्यात आंदोलन उभारणार की नाही? हे लवकरच समोर येईल.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
  • अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
  • तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला
  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in