• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NCP-NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये? मंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सूचक वक्तव्य, INDIA आघाडीचे वाढणार टेन्शन?

July 28, 2026 by admin Leave a Comment


Jaykumar Gore Big Statements: शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (Sharad Pawar NCP-NDA) जाण्याच्या चर्चांना मध्यंतरी ऊत आला. त्यातच विविध भेटीगाठींमुळे तर्क-वितर्क लढवले गेले.  या वृत्तांची एकच चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनातच मोठी घडामोड होण्याचे दावे-प्रतिदावे करण्यात आले.  आता मंत्री जयकुमार गोरे यांनी याविषयावर एक सूचक वक्तव्य केल्याने राजकारणाला उकळी फुटली आहे. त्यांनी याप्रकरणी थेट भाष्य केले नसले तरी मोठे संकेत दिले आहेत. काय म्हणाले जयकुमार गोरे?

शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये?

राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होण्याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी सूचक विधान केले आहे. एनडीए म्हणून आम्ही एकसंध आहोत. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए मध्ये एखादा दुसरा पक्ष वाढतोय पण कमी होण्याची शक्यता नाही. काहीजण बातम्या चालवत आहेत आणखी काही ऍडिशन होणार आहे डिलिशन नाही, असे सूचक वक्तव्य मंत्री गोरे यांनी केले आहे. इशाऱ्यातूनच त्यांनी हे संकेत दिले आहेत.

उजनी धरण भरले वीज पुरवठा सुरळीत

उजनी लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण 97 टक्के भरलेलं आहे. एल निनोचे संकट असताना धरण भरल्याने मोठे संकट टळले आहे. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे 8 तास वीजपुरवठा होणार असल्याचे गोरे म्हणाले. माझ्या माहितीनुसार असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. रोहित पवारांचे MPSC सेंटर कदाचित दुसरं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

धाराशिव बॅनर वादावर म्हणाले काय?

‘आपला जीव धाराशिव’ हे व्हिजन घेऊन झेडपीने संकल्प केला आहे. ग्रामीण भागात ग्रंथालय यासह विविध सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कामाच्या उणीवा शोधा राजकीय उणीवा शोधू नका. शिवसेना आणि इतर पक्षाचे नेते तेथे उपस्थित होते. झेडपीने जो प्रकल्प हाती घेतला आहे तो उत्तम आहे, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

E20 पक्ष आणि गडकरी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

आज आपण आणि विरोधक चालत असलेले रस्ते गडकरी यांच्या माध्यमातून झाले आहेत. मात्र सर्वोत्कृष्ट कामाला बदनाम करण्याची रीत आपल्याकडे आहे. विरोधकांनी ती रीत, ती पद्धत हातात घेतली आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यवस्थेला बदनाम केले की ते ते चांगले काम मागे राहते आणि बदनामीची गोष्ट पुढे येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in