• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्… राजकीय चर्चांना उधाण

July 12, 2026 by admin Leave a Comment


जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचा फोटो वापरण्यास त्यांनी परवानगी दिल्याचा दावा संजय पवार यांनी केला आहे.

संजय पवार यांनी सांगितले की, यासाठी त्यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. फोटो वापरण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी त्यांनी एक पत्र दिले होते. या पत्रावर शरद पवार यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मान्यता दिल्याचे लिहून स्वाक्षरी केल्याचा दावा त्यांनी केला.

यापुढे आपल्या प्रत्येक बॅनरवर अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांचा फोटो वापरणार असल्याचेही संजय पवार यांनी स्पष्ट केले. तसेच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, अशी अपेक्षाही संजय पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण… विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?
  • IND vs SL Test: भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम; काय ते जाणून घ्या
  • मुदतवाढ मिळाली तरी अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल; मंत्री प्रताप सरनाईकांनी ठणवाकवलं
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपके यांच्या CJP ने निवडणूक लढवली तर किती मतदान होणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती
  • काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in