• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NCP विलिनीकरणाला पुन्हा ब्रेक? सर्व जुळत असताना आता कुठं अडलं घोडं? तो पेच काही सुटेना…

July 24, 2026 by admin Leave a Comment


NCP Merger Sharad Pawar-Sunetra Pawar: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काही महत्त्वाच्या बिलासाठी शरद पवार राष्ट्रवादीचे मत वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा होता. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण विलिनीकरणानंतर संयुक्त राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? पक्ष एकत्रि‍करणानंतर प्रमुख कोण असणार? मंत्रिमंडळातील पद वाटप यासह इतर मुद्यांवरून पेच वाढला आहे. यामुळे एकत्रि‍करणाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार अध्यक्षपदासाठी आग्रही

संयुक्त राष्ट्रवादीचे नेतृत्व नेमके कुठल्या गटाने करावे? अजितदादांची राष्ट्रवादी की शरद पवारांची राष्ट्रवादी तिचे नेतृत्व करणार? या मुद्यावरून हा तिढा कायम आहे. अध्यक्ष पद, उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेतृत्व कोणता गट करणार आणि पद वाटपावरून तोडगा निघत नसल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक लागल्याचे समोर येत आहे. यापूर्वी सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची मोठी चर्चा झाली. पण त्यातून काहीच घडलं नाही. दोन्ही गटांनी चर्चेला विराम लागल्याचा दावा केला होता. INDIA आघाडीत राहायचे की NDA सोबत सत्तेत जायचे यावरून पेच कायम आहे.

विद्यार्थी आंदोलनाने चर्चेला विराम

दिल्लीतील जतंरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने मोठे आंदोलन (CJP Protest) उभारले आहेत. विरोधी पक्षही त्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरले आहे. आंदोलनाची धग आता देशभरात पोहचली आहे. दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत आणि मुंबईपासून ते पूर्वोत्तर राज्यातील इफांलपर्यंत आंदोलन तीव्र झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीतील एकत्रि‍करणासंदर्भातील चर्चांनाही विराम लागल्याचे समजते. विद्यार्थी आंदोलनामुळे ही चर्चा तात्पुरती खंडीत झाल्याचे समजते.

विलिनीकरणाला कुणाचा विरोध?

दोन्ही राष्ट्रवीदाच्या विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रवादी NDA ला पाठिंबा देणार का ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. डिलिमिटेशन विधेयकाला दोन्ही राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. पण विलिनीकरणाच्या चर्चा खंडित झाल्याचे सध्यातरी समोर येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
  • मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट… नेमकं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in