
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी महायुतीमध्ये सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार, अडीच वर्षांनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला महापौरपद मिळणार आहे. महापालिकेच्या निकालानंतर झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची महायुती सत्ता स्थापन करणार आहे. या सत्तावाटपामध्ये, महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे.
त्यानुसार, सुरुवातीची अडीच वर्षे भाजपचा महापौर असेल. त्यानंतर, पुढील सव्वा वर्षांसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेचा महापौर मुंबईला लाभेल. यानंतर उर्वरित सव्वा वर्षांसाठी पुन्हा भाजपचाच महापौर पदभार सांभाळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत वरिष्ठांनी हा निर्णय घेतला होता. सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर असणार असला तरी, भविष्यात शिंदे गटालाही महापौरपदाची संधी मिळणार हे या फॉर्म्युलाने स्पष्ट झाले आहे.
Leave a Reply