• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik Flood : गोदावरी नदीला पूर आल्याने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे गेली पाण्याखाली,नागरिकांना सर्तकतेचे आदेश

July 23, 2026 by admin Leave a Comment

गोदावरीला पूराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत झाल्यामुळे पूराच्या वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गोदावरी नदीपात्रातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.

गोदावरी नदीने पात्र सोडल्याने नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर सुमारे 70 टक्के पाण्यात बुडाले आहे. या पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्येही शिरल्याने शेतीचे नुकसान होणार आहे नदीकाठच्या नागरिकांना  प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरी नदीने पात्र सोडल्याने नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर सुमारे 70 टक्के पाण्यात बुडाले आहे. या पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्येही शिरल्याने शेतीचे नुकसान होणार आहे, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर नदीच्या पुराचे पाणी गेले आहे.  विभागीय आयुक्त प्रवीण गेडामजिल्हाधिकारी आयुष प्रसादपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.उपमहापौर विलास शिंदे यांनीही या स्थितीचा आढावा घेतला.

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.उपमहापौर विलास शिंदे यांनीही या स्थितीचा आढावा घेतला.

सायंकाळपर्यंत २५ ते ३० हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात विसर्ग होण्याचा अंदाज आहे. सध्या 13 हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाने केले आहे.

 नाशिकच्या गोदावरी पात्राचा स्तर वाढला असून कश्यपी धरण 61 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 1682 MCFT पाणी गंगापूर धरणात आले आहे. सध्या 12600 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरण हे 97 टक्के भरले आहे. नदी आणि नाल्यांमुळे होळकर नदीजवळ 7000 क्युसेस पाणी येत आहे. येथे इशारा पातळी 13045 क्युसेस आहे. धोका पातळी 19079 क्युसेस आहे. त्यापुढे पाणी वाढल्यास सराफ बाजारात पाणी शिरते.

 सगळ्या विभागांकडून नदीच्या काठावरील लोकांना स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. साधारण 24000 क्युसेस पाणी  6 वाजेपर्यंत गोदाघाटावर येण्याचा अंदाज आहे. नांदूर मध्यमेश्वर जवळ तीन गावांमध्ये लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. कॅचमेंट एरियामध्ये पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धोक्याच्या इशाऱ्याला आपण मॅनेज करू शकतो असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत सर्वाधिक  62000 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून धोक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज ठरला असून दुपारी 3 वाजल्यानंतर पाणी कमी होईल. त्र्यंबकेश्वरमध्ये काल एका रात्रीत 194 MM  पाऊस झाल्याने  गिरणा नदी पात्र वाढले आहे.  इगतपुरी सुरगाणामध्ये काही रस्ते बंद आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये 8 पर्यटकांवर घराचे पत्रे पडल्याने त्यात तीन जण जखमी झाले आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक 62000 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून धोक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज ठरला असून दुपारी 3 वाजल्यानंतर पाणी कमी होईल. त्र्यंबकेश्वरमध्ये काल एका रात्रीत 194 MM पाऊस झाल्याने गिरणा नदी पात्र वाढले आहे. इगतपुरी, सुरगाणामध्ये काही रस्ते बंद आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये 8 पर्यटकांवर घराचे पत्रे पडल्याने त्यात तीन जण जखमी झाले आहेत.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in