• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nana Patekar : ‘तुला खूप भेटले, पण मला तर…’, 25 वर्षांनंतर माधुरी दीक्षितला भेटताच नाना पाटेकरांची खोडकर टिपण्णी, व्हिडीओ व्हायरल

August 7, 2026 by admin Leave a Comment


Nana Patekar – Madhuri Dixit : ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘प्रहार’ सांरख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून दोघे कधी एकत्र दिसलेच नाहीत. सांगायचं झालं तर, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात दोघे एकत्र आल्याचे दिसत आहेत. फिल्मफेअरने माधुरी आणि नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये माधुरी आणि नाना पाटेकरांची भेट 25 वर्षांनंतर झाली असल्याचं सांगितलं आहे. तेव्हा नाना खोडकर टिप्पणी करत माधुरीला काय म्हणाले जाणून घ्या…

पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करत असलेला अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतो, ‘नाना काका बऱ्याच वर्षांनंतर आम्हाला हा दुर्मिळ क्षण पाहायला मिळत आहे… यावर काय सांगाल…’, असं विचारताच नाना पाटेकर म्हणाले, ‘मगाशी मी आतमध्ये तिला (माधुरी दीक्षित) म्हणालो, आपल्याला भेटून 25 वर्षे होऊन गेला… आता पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेटलो…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

 

पुढे नाना म्हणाले, ‘एकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मला मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुसस्कार भेटलेला.’ अशात नाना खोटकर टिपण्णी करत म्हणाले, ‘तुला आठवतंय का, तुला खूप मिळाले असतील, पण मला एकच मिळाला म्हणून आठवतंय…’, नाना पाटेकरांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर माधुरी हिला देखील हसू आवरलं नाही. नाना पाटेकरांच्या या वक्यावर जमलेले सगळेच पोट धरुन हसू लागले… सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. एक काळ असा होता, जेव्हा दोघांनी बॉलिवूड गाजवलेला. आजही त्यांचे अनेक सिनेमे तितक्यात आवडीने पाहिले जातात. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक पुरस्कारांनी दोघांना सन्मानित करण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांनी ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘क्रांतीवीर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर माधुरी हिला, ‘दिल’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कोण’, ‘बेटा’ यांसरख्या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in