• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, लोकांची तारांबळ, मैदान पाण्याखाली!

July 28, 2026 by admin Leave a Comment


Nagpur Rain Update : सध्या नागपुरात तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरत सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. काही वेळाने मात्र पावसाचा जोर वाढला. परिणामी अनेक भागांत सध्या पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर गुडघ्यांपर्यंत पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय. या पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. हवामान विभागाने नागपुरासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचले आहे. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाणी या भागात चांगलेच पाणी साचले आहे. या भागात पाऊस साचल्याने लोकांना ये-जा करायला त्रास होतोय. लोक त्या  भागात लावण्यात आलेल्या दोऱ्यांच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत आहेत.  सकाळपासून नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा येल्लो अलर्ट असल्याने दुपारी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागुरात ट्रॅफिक जाम

नागपुरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम ट्रॅफिकवरही झाला आहे.  मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रेडिसन ब्लुच्या उड्डाणपूल रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  तर काही ठिकाणी घराच्या अंगणपर्यंत पाणी पोहचलं आहे. म्हणूनच फारच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी सुखावले

दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी मात्र काहीसा सुखावला आहे. पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस गरजेचा होता. नागपुरात तसेच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. हा पाऊस पिकांच्या पुढील वाढीसाठी आवश्यक होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in